शिवसेना आमदार अधिवेशनासाठी मुंबईकडे, वाटेतच मेसेज, कोरोना पॉझिटिव्ह
रायगडमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे
रायगड : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या शिवसेना आमदाराची वाट ‘कोरोना’ने अडवली. रायगडमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज अर्ध्या वाटेत असताना आला. (Alibaug Shivsena MLA Mahendra Dalvi Corona Positive)
पावसाळी अधिवेशन असल्याने महेंद्र दळवी कारने मुंबईला यायला निघाले होते. धरमतर खाडी पुलापर्यंत आले असताना दळवी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मेसेजद्वारे आला. महेंद्र दळवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.
कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच तात्काळ ते माघारी फिरले. कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून पुढील दहा दिवस आपण घरीच क्वारंटाईन राहणार असल्याने त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे संपर्कातील कार्यकर्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोण आहेत महेंद्र दळवी?
अलिबाग-मुरुड मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महेंद्र दळवी यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अलिबाग-मुरुड मतदारसंघात महेंद्र दळवी यांनी शेकाप उमेदवार पंडित पाटील यांना 30 हजारांच्या मताधिक्याने पराभवाची धूळ चारली होती.
विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेलं यंदाचं पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस ( 7 आणि 8 सप्टेंबर) घेण्यात येणार आहे. कोव्हिड19 चे संकट लक्षात घेत या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. त्यामुळे विधिमंडळात ‘मास्कधारी’ सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बरसताना दिसतील. Alibaug Shivsena Mahendra Dalvi Corona
कोरोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत.
Vidhansabha Rainy Session Live | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून, विरोधक सत्ताधाऱ्यांवर बरसण्याच्या तयारीत https://t.co/Sy173UgkpO
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
संबंधित बातम्या :
पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना विधानसभा अध्यक्षांना कोरोना, नाना पटोले होम क्वारंटाईन
पावसाळी अधिवेशन | कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आमदारांना विधिमंडळात प्रवेशबंदी
(Alibaug Shivsena MLA Mahendra Dalvi Corona Positive)