Shivsena : न्यायालयाच्या निकालानंतरच सर्व प्रश्न सुटतील, विनायक राऊतांची सर्वोच्च न्यायालयाला काय आहे विनंती?
राज ठाकरे यांनी आज पदाधिकारी मेळाव्यात आपण शिवसेनेसोबत गद्दारी केली नाही तर पक्ष सोडणार हे सांगितले होते. बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन याबद्दल आपण त्यांना ही माहिती दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. शिवाय या त्यांच्या विधानाला खा. विनायक राऊत यांनी देखील दुजोरा दिलेला आहे.
रत्नागिरी : (Shiv Sena Party) शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण (Supreme Court) कोर्टात गेले आहे. यासंबंधी निकाल काय लागणार याकडे सबंध देशाचे लक्ष लागले आहे. असे असतानाच मंगळवारी या प्रकरणासह इतर चार याचिकांवर सुनावणी ही घटनापीठाकडे असणार हे स्पष्ट केले आहे. असे असले तरी (Constitution bench) घटनापीठाच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे यावर सुनावणी अधिकच्या काळासाठी लांबणीवर पडू नये, काळमर्यादेमध्ये हा खटला निकाली काढावा अशी विनंतीच आता खा. विनायक राऊत यांनी केली आहे. ठराविक कालमर्यादा मध्येच सुनावणी घेऊन यामध्ये निर्णय द्यावा अशी माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती असल्याचे राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे वेळ गेला तर शिवसेनेला कोणता धोका संभावतो हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
निकालानंतर प्रश्न सुटतील
सत्ता संघर्षानंतर दाखल करण्याच आलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती, पण हे प्रकरण अधिकच किचकट असल्याने आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे सुनावणी आणखी लांबणार यामध्ये शंका नाही. पण या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी न्यायाधिशांनी वेळेची मर्यादा ठेवावी अशी विनंतीच राऊत यांनी केली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईस तो मान्य असेल. शिवाय या निकालानंरच सर्व प्रश्न सुटणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी लांबणीवर जात आहे. आता 25 ऑगस्टपासून घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.
चिन्ह निर्णयाचा अधिकार यंत्रणेला नाही
शिंदे गटाच्या याचिकेमुळेही शिवसेना कुणाची हा प्रश्न तर उपस्थित झाला आहेच पण धनुष्यबाण याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पण चिन्हाबाबत निर्णय देण्याचा अधिकार कुण्याही यंत्रणेला नसेल असे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून ज्या याचिका दाखल झाल्या आहेत त्यावर लवकर सुनावणी झाली तर चित्र स्पष्ट होणार आहे. कोर्टाच्या निकालाकडे सबंध देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे घटनापीठापुढे हे प्रकरण असले निकालासाठी कालमर्यादा ठरवून घेतली तर वेळेत सर्वकाही होणार आहे.
राज ठाकरेंचे ते विधान सत्य
राज ठाकरे यांनी आज पदाधिकारी मेळाव्यात आपण शिवसेनेसोबत गद्दारी केली नाही तर पक्ष सोडणार हे सांगितले होते. बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन याबद्दल आपण त्यांना ही माहिती दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. शिवाय या त्यांच्या विधानाला खा. विनायक राऊत यांनी देखील दुजोरा दिलेला आहे. राज ठाकरेंचे ते विधान सत्य आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे यांच्या ‘माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय आजोबांचा आणि बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे. या त्यांच्या या विधानाचे राऊत यांनी स्वागत केले आहे.