‘नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश’, शिवसेनेची खोचक टीका

वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत," असा टोला विद्यमान शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावला. (Shiv Sena Nitesh Rane Satish Sawant)

'नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश', शिवसेनेची खोचक टीका
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 12:01 PM

सिंधुदुर्ग : वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत,” असा टोला विद्यमान शिवसेना नेते आणि पूर्वी नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी लगावला. ते ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राणे कुटुंबावर सडकून टीका केली. (All the leaders are joining Shiv Sena as they are fed up with the behavior of BJP MLA Nitesh Rane said Satish Sawant)

“वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रवेश करत असलेले सर्व 7 माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि नगरसेवक आहेत. या सर्वांचा पक्षप्रवेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे,” असे सतीश सावंत म्हणाले.

अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर भाजपचे 7 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांना हा फार मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे या नेत्यांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडणार नसून वैभववाडी नगरपंचायतीत संपूर्ण 17 जागा भाजपच जिंकेल असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

“आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही यामुळे या सात नगरसेवकांनी हे पाऊल उचलले आहे. वैभववाडीत भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. दोन महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप 17 जागेवर जिंकेल. भारतीय जनता पक्ष इथे मजबूत आहे. अमित शहा आल्यानंतर भाजपा आणखी मजबूत झाला आहे. अमित शहांचे पाय जिथे जिथे लागतात तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलतं हा देशातला इतिहास आहे. भारतीय जनता पक्ष मजबुतीने उद्याच्या निवडणुकांना सामोरे जाईल,” असे राजन तेली म्हणाले.

इतर बातम्या :

ठाकरे सरकारचेही तेच झाले; नितेश राणेंचा कांजूरमार्ग कारशेडवरून टोला

सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? फडणवीसांकडून ऐका

(All the leaders are joining Shiv Sena as they are fed up with the behavior of BJP MLA Nitesh Rane said Satish Sawant)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.