Cabinet Expansion : नाराज बच्चू कडूंच्या मनधरणीचा प्रयत्न, आख्खं मंत्रिमंडळच जाणार समजूत काढायला..!

मंत्रिमंडळात आपला समावेश होईल असा विश्वास आ. बच्चू कडू यांनी अगदी सरकारची स्थापना झाल्यापासून व्यक्त केला होता. शिवाय काही मंत्र्यांनी तर मंत्रीपद कुणाला नको म्हणत थेट पदाची मागणी केलीच होती. त्यामुळे सर्वकाही एकनाथ शिंदे म्हणतील असेच होणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात स्थिती आता बदलू लागली आहे.

Cabinet Expansion : नाराज बच्चू कडूंच्या मनधरणीचा प्रयत्न, आख्खं मंत्रिमंडळच जाणार समजूत काढायला..!
आ. बच्चू कडू
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 4:11 PM

मुंबई : नाही म्हणलं तरी (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Bachchu Kadu) बच्चू कडू यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचे नाव नव्हते. तर हा केवळ पहिला टप्पा असून त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल पण हे सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेच असतात असे म्हणत (Deepak Kesarkar) केसरकरांनी दुहेरी भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित खात्यामध्ये काम करण्यास आवडेल असेही कडूंनी सांगितले होते. पण मंत्रिमंडळातच समावेश झाला नसल्याने ते नाराज असल्याचे लपून राहिलेले नाही. तर त्यांची मनधरणी आता सर्वच नवनियुक्त मंत्र्यांकडून केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व मंत्र्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होणार हे देखील पहावे लागणार आहे.

आत्मविश्वास असलेल्या कडूंना वगळले

मंत्रिमंडळात आपला समावेश होईल असा विश्वास आ. बच्चू कडू यांनी अगदी सरकारची स्थापना झाल्यापासून व्यक्त केला होता. शिवाय काही मंत्र्यांनी तर मंत्रीपद कुणाला नको म्हणत थेट पदाची मागणी केलीच होती. त्यामुळे सर्वकाही एकनाथ शिंदे म्हणतील असेच होणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात स्थिती आता बदलू लागली आहे. आ. बच्चू कडू यांनी तर आपल्याला ग्रामीण भागच्या जनतेशी जुडलेल्या खात्यामध्ये काम करण्यास आनंद होईल असेही सांगितले होते. पण पहिल्या टप्प्यात त्यांचा नंबर लागला नसून आता काय होईल हे पहावे लागणार आहे.

सर्वजण भेटून मनधरणी करणार

शिंदे गटात मंत्रिपदावरुन कोणाचीही नाराजी नसल्याचे प्रवक्ते दीपक केसरकर हे पटवून देत आहेत. तर उर्वरित आमदारांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे सर्व सांगत असताना कुणाला मंत्रीपद द्यायचे आणि नाही हे ठरविण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असल्याचेही ते म्हणाले आहेत. पण जर बच्चू कडू नाराज असतील तर त्यांना आम्ही सर्व मंत्री भेटणार असल्याचेही केसरकरांनी सांगितले आहे. त्यामुळे आतापर्यंत शिंदे गटात सर्वकाही अलबेल असल्याचे सांगण्यात येत होते पण मंत्रिमंडळ आणि यानंतर खातेवाटपानंतर काय होईल हे पहावे लागणार आहे.

खातेवाटपही लांबणीवर

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील कोणीही नाराज नाही. शिवाय तसे काही कारणही नाही. सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा शब्द प्रमाण असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. इतरांना पुढच्या टप्प्यात संधी मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला तर खाते वाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचे सांगितले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच आता कोणते खाते मिळणार यावरुन कार्यकर्ते आणि मंत्री यांची देखील उत्सुकता शिघेला पोहचली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी की नंतर हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.