लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय […]

लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आजपासून महिन्याने म्हणजेच 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल.

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

  • पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
  • दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
  • तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
  • चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान

1) महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम

tv9marathi.com

2) महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान-  बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

tv9marathi.com

3) महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान- जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

tv9marathi.com

4) महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान-  नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई

पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान

  • अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च
  • अर्ज छाननी – 26 मार्च
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च
  • मतदानाची तारीख – 11 एप्रिल
  • निकाल – 23 मे

4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होत आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांचा समावेश आहे.

तसंच लोकसभेसोबतच 12 राज्यातील विधानसभेच्या 34 जागांसाठी पोटनिवडणूकही होणार आहे.

कोणत्या टप्प्यात किती जागा, कधी मतदान? 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी मतदान होईल. 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 97 जागांसाठी मतदान होईल.

23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 125 जागांसाठी मतदान होईल.

29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 जागांसाठी मतदान होईल.

6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्यातील 51 जागांसाठी मतदान होईल.

12 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 जागांसाठी मतदान

19 मे रोजी 8 राज्यात 59 जागांसाठी मतदान होईल.

दिल्लीत 12 मे रोजी मतदान होईल.

प्रत्येक मशीनमध्ये VVPAT यंदा प्रत्येक ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट मशीन असेल. त्यामुळे मतदाराने आपण मत कोणाला केलं हे त्याला समजेल.

प्रत्येक उमेदवाराला यावेळी फॉर्म 26 भरावा लागणार आहे. देशभारतील 10 लाख मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी ही संख्या 9 लाख होती. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सर्व निवडणूक प्रक्रियेची व्हिडीओग्राफी होणार.

उमेदवारांसाठी PAN आवश्यक, तीन वेळाच वृत्तपत्रात जाहिरात निवडणूक प्रक्रियेसाटी ईको फ्रेंडली सामुग्रीच्या वापराचा सल्ला निवडणूक आयोगाने दिला आहे. कोणताही उमेदवार केवळ 3 वेळाच वृत्तपत्रात जाहिरात देऊ शकेल. उमेदवाराला PAN कार्ड डिटेल द्यावे लागतील, जर त्याने न दिल्यास उमेदवारीच रद्द केली जाईल.

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाईडस्पीकरवरुन प्रचाराला बंदी असेल.

सोशल मीडियावरील प्रचार खर्चाचा तपशील द्यावा लागेल. सर्व उमेदवारांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती द्यावी लागले.

एकूण 90 कोटी मतदार, तर युवा मतदारांची संख्या दीड कोटी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये यंदा 90 कोटी मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत 81 कोटी मतदार होते. 2014 पेक्षा यंदा 8.40 कोटी मतदार वाढले आहेत. तर युवा मतदारांची संख्या दीड कोटी आहे. 18 ते 19 वर्षांचे युवा मतदार आहेत.

मतदार यादीत नाव आहे की नाही? देशभरातील 99.3 टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. 1095 या नंबरवर SMS करुन मतदार आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही ते शोधू शकते. हा नंबर टोल फ्री आहे. तारखांच्या घोषणेनंतर 10 दिवसांनी मतदार यादीत कोणताही बदल होणार नाही. प्रत्येक घरात मतदार मार्गदर्शिक दिली जाईल.

कुठल्या टप्प्याचं कधी मतदान :

  • पहिला टप्पा- 11 एप्रिल
  • दुसरा टप्पा – 18 एप्रिल
  • तिसरा टप्पा – 23 एप्रिल
  • चौथा टप्पा – 29 एप्रिल
  • पाचवा टप्पा – 6 मे
  • सहावा टप्पा – 12 मे
  • सातवा टप्पा – 19 मे

कुठल्या टप्प्यात किती मतदारसंघात मतदान?

  • पहिला टप्पा – 91 सीट (20 राज्य)
  • दुसरा टप्पा – 97 सीट (13 राज्य)
  • तिसरा टप्पा – 125 सीट (14 राज्य)
  • चौथा टप्पा – 71 सीट (9 स्टेट्स)
  • पाचवा टप्पा – 51 सीट (7 राज्य)
  • सहावा टप्पा – 59 सीट (7 राज्य)
  • सातवा टप्पा – 59 सीट (8 राज्य)

संबंधित बातम्या

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा  

महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून मतदान, 23 मे रोजी निकाल   

महाराष्ट्रातील सद्यस्थिती, कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार? 

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.