‘BHR घोटाळ्यात गिरीश महाजनांशी संबंधित कंपनीचा सहभाग; पैसे खाताना कचराही सोडला नाही’ : अनिल गोटे

गिरीश महाजन यांचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या एका कंपनीचा या बीएचआर घोटाळ्यात थेट संबंध आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला. (Anil Gote Girish Mahajan)

'BHR घोटाळ्यात गिरीश महाजनांशी संबंधित कंपनीचा सहभाग; पैसे खाताना कचराही सोडला नाही' : अनिल गोटे
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 6:23 PM

नाशिक : भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील कथित 1100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी राजकीय गोटात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ” भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या एका कंपनीचा बीएचआर घोटाळ्यात थेट संबंध आहे,” असा थेट आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला. तसेच, पैसे खाताना त्यांनी कचराही सोडला नाही अशी टीकाही त्यांनी महाजनांवर केली. ते नाशिकमध्ये बोलत होते. (allegations of Anil Gote on Girish Mahajan on BHR scam)

“गिरीश महाजन यांचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या एका कंपनीचा बीएचआर घोटाळ्यात थेट सहभाग आहे. या कंपनीचे सुनील झवर, संचेती आणि बोरा असे तीन संचालक आहेत. हे तिन्ही संचालक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत, यांनी पैसे खाताना कचरासुद्धा सोडला नाही,” असे अनिल गोटे म्हणाले. तसेच, शंभर टक्के पुराव्यांसहित बोलत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. नाशिक, धुळे, जळगाव येथील महापालिका आयुक्त, महापौर स्थायी समितीचे सभापती हे देखील या गैरव्यवहारात भागीदार असल्याचा गौप्यस्फोट अनिल गोटे यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील कथित 11100 कोटींचा घोटाळा उघड करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जळगावातील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही. सुनील झंवर हा माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे. त्यामुळे मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

“या घोटाळ्यात माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असेल तर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. कोणाच्या पतसंस्थेत घोटाळा झाला, याचीही चौकशी व्हावी. मात्र, माझ्यावर केवळ राजकीय कारणासाठी आरोप होत आहेत. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल,” असे गिरीश महाजन यांनी सांगितले. ते गुरुवारी (3 डिसेंबर) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संबंधित बातम्या :

बीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल होणार; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही; खडसेंच्या इशाऱ्यानंतर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा : एकनाथ खडसे

(allegations of Anil Gote on Girish Mahajan on BHR scam)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.