फडणवीसांच्या काळात सिडको घोटाळ्याचा आरोप, कॅगच्या अहवालात ठपका?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सिडकोमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

फडणवीसांच्या काळात सिडको घोटाळ्याचा आरोप, कॅगच्या अहवालात ठपका?
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 11:33 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सिडकोमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला आहे (Fadnavis Government and Corruption in CIDCO). कॅबिनेट बैठकीत कॅगचा अहवाल चर्चेला आला असताना त्यात कॅगने मारलेल्या गंभीर ताशेऱ्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता फडणवीसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांना घेरण्याचा प्रयत्न करण्याची प्रयत्न करत असल्याचंही बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “कॅगच्या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. यावर ठाकरे सरकारच्या कॅबिनेटमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे.” कॅगच्या या अहवालाने विरोधी पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्ष भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. यावर बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अजून कॅगचा अहवाल आमच्या हातात आलेला नाही. विधानसभेच्या पटलावरही असा अहवाल आलेला नाही. हा अहवाल खरा की खोटा हे मला माहिती नाही. मात्र, अशा पद्धतीने कुणी हा अहवाल बाहेर सांगत असेल, तर गोपनीयतेचा भंग होत आहे. मंत्री म्हणून आपण गोपनीयतेची शपथ घेतो. असं असतानाही तो अहवाल विधीमंडळात येत नाही, आमदारांना कळत नाही आणि माध्यमांपर्यंत पोहचत असेल तर तो हक्कभंग आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागेल. याला शिक्षाही होते.”

25 वर्षांचे कॅगचे अहवाल पाहिले तर 4 कागद कमी आहेत म्हणून ठपका ठेवतात. त्या कागदांमधील माहिती त्यांना पोहचली नाही म्हणून ते ठपका ठेवतात. माहिती पोहचली की ठपका मागे घेतात. याचा अर्थ गैरव्यवहार झाला, भ्रष्टाचार झाला असा नाही. भाजप, शिवसेना आणि आरपीआय असं मित्रपक्षांचं युतीचं सरकार होतं, ते जनसेवेसाठी होतं. ते पारदर्शकतेने काम करणारं सरकार होतं. आम्हाला विश्वास आहे की आम्ही चूक करणारच नाही, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या:

Fadnavis Government and Corruption in CIDCO

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.