विद्यार्थी लाभार्थ्यांना कच्चा धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांची मागणी

राज्यातील शाळा (School) एप्रिल (April) आणि मे महिन्यात सुटीमुळे बंद राहणार आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहाराचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देणे शक्य होणार नाही.

विद्यार्थी लाभार्थ्यांना कच्चा धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांची मागणी
शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांची मागणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 3:46 PM

मुंबई – राज्यातील शाळा (School) एप्रिल (April) आणि मे महिन्यात सुटीमुळे बंद राहणार आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहाराचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देणे शक्य होणार नाही. म्हणून एप्रिल आणि मे या दोन महिन्यासाठी शालेय पोषण आहाराचे काम करणाऱ्या महिला सहकारी संस्थांना दोन महिने कच्चे धान्य पुरवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केली आहे.

असंख्य शाळांना एप्रिलमध्येच सुटी मिळणार आहे

शालेय अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असेल अशा शाळा 30 एप्रिल 2022 पर्यंत सुरू ठेवण्याची गरज नाही, असे सुधारित आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे असंख्य शाळांना एप्रिलमध्येच सुटी मिळणार आहे. पण ज्या शाळांचा अभ्याक्रम पुर्ण झालेला नाही अशा शाळा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत.

दोन महिने शाळांना सुट्या असणार आहे

या महिन्यातही विद्यार्थी फक्त परीक्षा देण्यासाठी दोन-तीन तासाकरता शाळेत येत आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहार योजनेतून या विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे अन्न शिजवून देण्यासाठी स्वयंपाकी ठेवणे, किचन चालवणे, अन्न धान्याचा साठा करणे हे अवघड झाले आहे. पुढे जवळपास दोन महिने शाळांना सुट्या असणार आहेत. म्हणून या दोन महिन्यासाठी या महिला सहकारी संस्थांना कच्चे धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, अशी मागणी प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Inflation : युवासेनेचं राज्यव्यापी थाळी बजाव आंदोलन, रस्त्यावर भाकरी, पुतळ्याला जोडे, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

Pakistan Political Crisis: इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!

मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.