मंत्री नसतानाही त्यांच्या नावे शासकीय विश्रामगृहाचे बुकींग, अंबादास दानवेंचा संताप, म्हणाले “त्यांच्या घरचा…”

विशेष म्हणजे कोणताही पीए किंवा संबंधित मंत्री त्या विश्रामगृहात उपस्थित नव्हता. पण तरीही त्यांच्या नावाने सूटचे बुकींग असल्याने अंबादास दानवेंनी संताप व्यक्त केला.

मंत्री नसतानाही त्यांच्या नावे शासकीय विश्रामगृहाचे बुकींग, अंबादास दानवेंचा संताप, म्हणाले त्यांच्या घरचा...
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 7:03 PM

Ambadas Danve Video : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. अंबादास दानवे हे दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात गेले होते. त्यावेळी या शासकीय विश्रामगृहातील काही सूट मंत्री आणि त्यांच्या पीएच्या नावाने बुक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. यावरुन अंबादास दानवेंनी संबंधित कर्मचाऱ्यांना याप्रकरणी जाबही विचारला आहे.

राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दोन दिवसांपूर्वी बीड, संभाजीनगर आणि धाराशिव दौऱ्यासाठी गेले होते. हा दौरा संपल्यानंतर अंबादास दानवे हे पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये गेले होते. या शासकीय विश्रामगृहात पोहोचल्यानंतर अंबादास दानवेंना काही सूट मंत्री आणि त्यांच्या पीएच्या नावाने कायमस्वरुप बुक केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे कोणताही पीए किंवा संबंधित मंत्री त्या विश्रामगृहात उपस्थित नव्हता. पण तरीही त्यांच्या नावाने सूटचे बुकींग असल्याने अंबादास दानवेंनी संताप व्यक्त केला.

यानंतर अंबादास दानवेंनी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरत त्याला याबद्दल जाब विचारला. मंत्र्याची शासकीय विश्रामगृहात बुकिंग नाही तरी सूटचे बुकींग का करुन ठेवले आहे? असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. मी इकडे आलोय तर बाहेर सतरंजी टाकून झोपेन, ते मंत्री स्वतः इथे असते तर मला मान्य आहे? इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वेगळे सूट आहेत ना? मग अधिकाऱ्यांना प्रोटोकोल माहित आहे का नाही? असेही अंबादास दानवे म्हणाले.

अंबादास दानवेंचा व्हिडीओ व्हायरल

त्यावर तो कर्मचारी म्हणाला या ठिकाणी ते किंवा त्यांचे पीए राहतात. यानंतर अंबादास दानवे यांनी ते इथे असतील तर ना? आता ते इथे आहेत का? ते इथे नसताना तुम्ही तो सूट कोणाला देता का? त्यावर त्या कर्मचाऱ्याने नकारार्थी मान डोलवत नाही म्हटले. त्यावर अंबादास दानवेंनी मग स्फूटणीमध्ये एक नंबरचा सूट बंद का आहे? मंत्र्याच्या अनुपस्थितीमध्ये एक नंबरचा सूट तुम्ही कोणाला देता? तो सूट काय त्यांच्या घरचा आहे का? तुम्ही त्यांना का देता? तुम्हाला तशी ऑर्डर आहे का? कोण आहे इंजिनियर? असे अनेक प्रश्नही त्याला विचारले.

दरम्यान अंबादास दानवे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंबादास दानवे पुण्यातील शासकीय विश्रामगृहातील कोणत्या सूटचा उल्लेख करत आहेत? हा सूट नेमका कोणता आहे? त्याचे बुकींग कोणाच्या नावे आहे? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.