राष्ट्रवादी नकोय तर अजित पवार यांच्यासोबत कुस्ती महासंघात एकत्र कसे?; दानवे यांचा कीर्तिकर यांना सवाल

हे शिंदे गटात जाणारे नेते उद्या शिवसेनेची सत्ता आली तर परत येण्यात सगळ्यात आघाडीवर असतील. हा सगळा सत्तेचा खेळ आहे, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.

राष्ट्रवादी नकोय तर अजित पवार यांच्यासोबत कुस्ती महासंघात एकत्र कसे?; दानवे यांचा कीर्तिकर यांना सवाल
राष्ट्रवादी नकोय तर अजित पवार यांच्यासोबत कुस्ती महासंघात एकत्र कसे?; दानवे यांचा कीर्तिकर यांना सवाल Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 12:18 PM

जालना: खासदार गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातून आतापर्यंत 13 खासदार शिंदे गटात गेल्याने हा ठाकरे गटासाठी मोठा सेटबॅक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कीर्तिकर यांनी पक्ष सोडल्याने त्यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीसोबत जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय न पटल्यानेच आपण पक्षांतर केल्याचा दावा कीर्तिकर यांनी केला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. शिवसेनेची राष्ट्रवादी सोबतची युती नकोय तर मग अजित पवार यांच्यासोबत कुस्ती महासंघात काम कसे करता? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. गजानन कीर्तिकर यांचं शिवसेना सोडणं धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. पक्षाने कीर्तिकर यांना नेतेपद, मंत्रीपद, आमदारकी आणि खासदारकीसह सगळं दिलं होतं. अशा पध्दतीने शिवसेना सोडणं आणि त्यातही फुटकळ कारणासाठी शिवसेना सोडणं योग्य नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिवसेना ही सामान्य शिवसैनिकाला मान देणारी आहे. जेष्ठांना तर शिवसेना न्याय देतेच. गजानन कीर्तिकर हेच यापूर्वी भाजपवर टीका करत होते. भाजप शिवसेनेचा गळा दाबतेय असा आरोप करत होते. त्यांची अशी भाषणे सुध्दा आहेत. पण बाहेर पडण्यासाठी काहीही कारणं देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

गजानन कीर्तिकर एकीकडे राष्ट्रवादीवर आरोप करतात. राष्ट्रवादीसोबत जाणं घातक असल्याचं सांगतात. राष्ट्रवादीमुळे शिवसेनाचा आत्मघात होईल असंही सांगतात. तर दुसरीकडे अजित पवारांसोबत ते कुस्ती महासंघात काम करतात. अजित पवार कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादीचेच ना? मग हे कसं चालतं? असा सवालही त्यांनी केला.

हे शिंदे गटात जाणारे नेते उद्या शिवसेनेची सत्ता आली तर परत येण्यात सगळ्यात आघाडीवर असतील. हा सगळा सत्तेचा खेळ आहे, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.

भारत जोडो यात्रा देश तोडण्याच्या भूमिकेच्या विरोधातली यात्रा आहे. त्यामुळे आम्ही भारत जोडोला पाठिंबा दिला आहे. आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. अब्दुल सत्तार मंत्रिमंडळ आणि सत्तेच्या दृष्टीने सेफ असतील. मात्र जनतेच्या मनातून अब्दुल सत्तार हे पूर्णपणे अनसेफ आहेत, असा हल्लाबोल त्यांनी चढवला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.