दंगली भडकवण्यासाठी गर्दीत घुसलेल्यांना ओळखा आणि पकडून द्या, इम्तियाज जलील हिंसेविरोधात कडाडले
नुपूर शर्माने जे वक्तव्य केलंय त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे म्हटलं आहे. हे वक्तव्य करून 10 दिवस झाले, लोक दहा दिवस शांत बसले मात्र काहीही कारवाई झालेली नाही. फक्त पार्टीतून काढून टाकलं म्हणजे कारवाई होत नाही, गुन्हा दाखल झाला पाहिजे.
औरंगाबाद : भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावर देशभर मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. तर आज राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. यामुध्ये नाशिक, औरंगाबाद, परभणीमध्ये मुस्लिम धर्मियांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला होता. हा मोर्चा जुम्माच्या नमाजनंतर काढण्यात आला. ज्यात मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले. तर असाच निषेध मोर्चा आज एएमआयएमच्या नेतृत्वात औरंगाबादमध्येही आयोजित करण्यात आला होता. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी नुपूर शर्मा व कुमार जिंदाल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच त्यांनी दंगाभडकावणाऱ्यांना धरून पोलिसांकडे देण्याची जबाबदारी ही मुस्लिमसमाजाची असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हे करण्याची जबाबदारी सच्चा मुस्लिमानची असल्याचेही म्हटलं आहे.
गुन्हा दाखल झाला पाहिजे
सध्या देसात भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा विरोधत रस्त्यावर उतरला आहे. तसेच पूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावर देशभर मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. याचदरम्यान राज्यातील अनेक भागातही आज जुम्माच्या नमाजनंतर लोक घराबाहेर पडले आणि आपला निषेध नोंदवला. आज औरंगाबादमध्येही असाच निषेध मोर्चा काढला. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देशात वातावरण तणावपूर्ण बनले आहे. नुपूर शर्माने जे वक्तव्य केलंय त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे म्हटलं आहे. हे वक्तव्य करून 10 दिवस झाले, लोक दहा दिवस शांत बसले मात्र काहीही कारवाई झालेली नाही. फक्त पार्टीतून काढून टाकलं म्हणजे कारवाई होत नाही, गुन्हा दाखल झाला पाहिजे. अटक झाली पाहिजे. मुहंमद पैगंबर यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी एक कायदा झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
नशेखोर लोकांवर कारवाई ही झालीच पाहिजे
तसेच यावेळी खासदार जलील यांनी आंदोलन करताना खबरदारी घ्यावी असे म्हटलं आहे. कारण या आंदोलनात काही दंगेखोर घुसतील, ते दंगा भंडकवतील. आणि आता या आंदोलनातही काही लोक घुसले आहेत. त्यांचा हा हेतू चांगला नाही. मात्र पोलिसांनी परिस्थिती चांगली हाताळली आहे. मात्र अशा या धर्माच्या नावाने दंगेखोर, नशेखोर लोकांवर कारवाई ही झालीच पाहिजे असे ते म्हणाले. तसेच प्रत्येक सच्चा मुस्लिमाची ही जबाबदारी आहे की आशा नशेखोर लोकांची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.