Amit Shah : अमित शाह यांचा ताफा जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेलाही अडवलं? व्हायरल व्हिडीओने चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
व्हिडीओ ट्वीटरवर अपलोड करत अनेकांनी मुंबई वाहतूक पोलिसांवर टीका केली होती. रुग्णवाहिकेला थांबवून मंत्र्यांचा ताफा का जाऊ दिला गेला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. अखेर या सगळ्या मुंबई वाहतूक पोलिसांचं काय म्हणणंय, तेही समोर आलं आहे.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा (Amit Shah Convoy) जातानाचा मुंबईतील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral Video) झालाआहे. हा ताफा जाताना एक रुग्णवाहिकाही (Ambulance) पोलिसांनी अडवली होती, असं व्हिडीओमध्ये दिसतंय. यावरुन सोशल मीडियात चर्चांना उधाण आलं होतं. अखेर पोलिसांनीही या व्हायरल व्हिडीओवर आपलं म्हणणं मांडलं आहे. नेमकं पोलीस काय म्हणाले आणि हा एकूणच सगळा प्रकार काय होता, हे सविस्तर जाणून घेऊयात.
सगळ्यात आधी व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय ते समजून घेऊन. व्हायरल व्हिडीओमध्ये एका वाहतूक पोलिसाने एका बाजूची वाहतूक रोखून धरली असल्याचं दिसलंय. यानंतर एका मागून एक गाड्या जाताना दिसतात. या व्हिडीओमध्ये रुग्णवाहिकेचा सायरनही वाजताना ऐकू येतो आहेत. तसंच पोलिसांच्या वाहनांचाही आवाज व्हिडीओ कैद झालाय. नेमकं या व्हिडीओमध्ये काय आहे, ते एकदा पाहून घ्या.
पाहा व्हिडीओ :
This is very sad to see where an ambulance was asked to wait so that @AmitShah could pass by. @ndtv@ndtvvideos @BrutIndia @aajtak @MumbaiPolice #AmitShah #roadsafety #road #Ambulance #VIP #life #lifematters #marol #andheri pic.twitter.com/uqXUZ6n2U6
— Jesson Jose (@JoseJesson) September 5, 2022
वरील व्हिडीओ ट्वीटरवर अपलोड करत अनेकांनी मुंबई वाहतूक पोलिसांवर टीका केली होती. रुग्णवाहिकेला थांबवून मंत्र्यांचा ताफा का जाऊ दिला गेला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. अखेर या सगळ्या मुंबई वाहतूक पोलिसांचं काय म्हणणंय, तेही समोर आलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सदर व्हिडीओ हा अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथील आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याकारणाने या ठिकाणची वाहतूक रोखण्यात आली होती. याचवेळी एक रुग्णवाहिकाही त्याठिकाणी होती.
So @MumbaiPolice has clarified that there was no patient in ambulance that was stopped to allow HM convoy to pass by. Ambulance Siren the police say was ‘dysfunctional’ so it couldn’t be turned off! #Ambulance #VVIP https://t.co/OxrJSY94d8
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) September 7, 2022
पण महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत कुणीही रुग्ण नव्हता, असंही पोलिसांनी म्हटलंय. तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेचा सायरस बंद होत नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरस सुरुच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलंय. याबाबत रुग्णवाहिका चालकाचाही जबाबब लवकरच नोंदवून घेतला जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.
अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. रविवारी त्यांचं मुंबईत आगमन झालं होतं. तर सोमवारी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर ते वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी सागर बंगल्यावर भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. सोबत त्यांनी पवई येथे एका शाळेच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती.