VIDEO : अमित शाहांचा पाय स्लीप, व्हायरल झाल्या क्लिप

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी शनिवारचा दिवस चांगलाच अडचणीचा ठरला. त्याचं झालं असं की, शनिवारी अमित शाह हे दोनदा पडले. आधी एका रोड शो दरम्यान, त्यानंतर हेलीकॉप्टरमधून उतरताना. पहिल्यांदा रथातून… पहिल्यांदा पडले, ते मध्य प्रदेशातील रोड शो दरम्यान. अशोकनगर येथील तुलसी पार्क येथे प्रचाराच्या रथातून उतरताना पाय घसरुन पडले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकाने लगेच […]

VIDEO : अमित शाहांचा पाय स्लीप, व्हायरल झाल्या क्लिप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी शनिवारचा दिवस चांगलाच अडचणीचा ठरला. त्याचं झालं असं की, शनिवारी अमित शाह हे दोनदा पडले. आधी एका रोड शो दरम्यान, त्यानंतर हेलीकॉप्टरमधून उतरताना.

पहिल्यांदा रथातून…

पहिल्यांदा पडले, ते मध्य प्रदेशातील रोड शो दरम्यान. अशोकनगर येथील तुलसी पार्क येथे प्रचाराच्या रथातून उतरताना पाय घसरुन पडले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकाने लगेच त्यांना उठण्यास आधार दिला. या घटनेत सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही.

दुसऱ्यांदा हेलिकॉप्टरमधून…

त्यानंतर आणखी एक बातमी आली की, शाह हे हेलिकॉप्टरमधून उतरताना पडले. मिझोरम येथे पश्चिम तुईपुई विधानसभा क्षेत्रात शाह यांची निवडणूक प्रचार सभा होती. लाबंग गावात त्यांचा हेलिकॉप्टर उतरला आणि हेलिकॉप्टरमधून खाली उतरत असताना त्यांच्याकडून चुकून एक पायरी सुटली. त्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते जमिनीवर पडले. त्यांच्या सोबतच्या एका व्यक्तीने लगेच त्यांना उठण्यास मदत केली, त्यांचे कपडे झटकले. या घटनेतही शाहांना सुदैवाने कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर मग काय, ट्रोलर्सनी आपली मोर्चा अमित शाह यांच्याकडे वळवला. मग राजस्थान, मध्य प्रदेश निवडणुकीच्या अनुशंघाने जोक्सचा सुळसुळाट सुरु झाला. कुणी व्हिडीओ एडिट करुन पोस्ट करत होतं, तर कुणी मीम्स करत होतं, काही काळजी व्यक्त करत होते, तर कुणी आणखी काही! आता सोशल मीडियावर विनोदबुद्धीला किती तुफान पेव फुटतो, हे काय आम्ही तुम्हाला सांगायला नको. त्यातीलच काही पोस्ट आम्ही तुम्हाला खाली दिल्या आहेत :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.