Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला : अमित शाह

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Goregaon) रविवारी (22 सप्टेंबर) मुंबईत येत आहेत.

कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला : अमित शाह
Follow us
| Updated on: Sep 22, 2019 | 4:49 PM

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Goregaon) रविवारी (22 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी कलम 370 मधील बदल आणि जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयावर भाष्य केलं.

अमित शाह यांनी आपल्या भाषणात कलम 370 वर बोलताना विरोधी पक्षांना चांगलंच लक्ष्य केलं. ते म्हणाले, “कलम 370 आणि ’35 अ’ला जनसंघ आणि भाजपकडून पहिल्यापासूनच विरोध राहिला आहे. भारतीय जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच काश्मीरसाठी पहिलं बलिदान दिलं. काश्मीरमधून कलम 370 न हटवणं हा काँग्रेससाठी राजकीय मुद्दा होता. मात्र, कलम 370 हटवणं हा भाजपसाठी भारताला एकसंघ ठेवण्याचा मुद्दा होता. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला आहे.”

शाह यांनी यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, “राहुलबाबा, तुम्ही आत्ता राजकारणात आलात. आमच्या 3 पिढ्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिलं आहे.

“कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला”

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 मुळेच दहशतवाद फोफावल्याचा आरोपही शाह यांनी केला. कलम 370 मुळे पाकिस्तानच्या हाती आयतं कोलीत मिळालं. जम्मू काश्मीरमधील सूफी संत आणि काश्मिर पंडितांना बाहेर हाकलण्यात आलं. 40 हजार जणांचे जीव गेले. देशात दहशतवाद फोफावला. अनेक विकास कामं खोळंबली. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महत्त्वाच्या कायद्यांची अंमलबजावणी करता आली नाही.”

Live Updates

[svt-event title=”कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला : अमित शाह” date=”22/09/2019,1:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राहुलबाबा, तुम्ही आता राजकारणात आलात, आमच्या तीन पिढ्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिलं आहे : अमित शाह” date=”22/09/2019,1:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भ्रष्टाचार नसता तर प्रत्येक काश्मीरी नागरिकाच्या घराच्या छतावर सोन्याचे पत्रे असते : अमित शाह” date=”22/09/2019,1:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काश्मीरमधून कलम 370 न हटवणं काँग्रेससाठी राजकीय मुद्दा : अमित शाह” date=”22/09/2019,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काश्मीरसाठी पहिलं बलिदान भारतीय जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जींनी दिलं : अमित शाह” date=”22/09/2019,1:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कलम 370 हटवल्याने काश्मीर भारताचा अविभाज्य भाग: अमित शाह” date=”22/09/2019,1:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार : अमित शाह” date=”22/09/2019,1:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निवडणुकीपूर्वी काहीही झालं नाही तरी भाजपचाच विजय, अमित शाहांचा शरद पवारांना टोला” date=”22/09/2019,1:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सत्तर वर्षांनी जम्मू, श्रीनगर, लडाखमध्ये भारताचा तिरंगा फडकला : फडणवीस” date=”22/09/2019,12:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अमित शहा गोरेगाव सभास्थळी दाखल” date=”22/09/2019,12:37PM” class=”svt-cd-green” ] अमित शहा गोरेगाव सभास्थळी दाखल, मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते हजर, मोठ्या जनसमुदायासमोर कलम 370 वर मांडणी करणार [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल” date=”22/09/2019,12:30PM” class=”svt-cd-green” ] अमित शाह मुंबईत दाखल, गोरेगावमधील सभेसाठी प्रस्थान, थोड्याच वेळात सभेला संबोधित करणार [/svt-event]

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अमित शाह यांनी गोरेगाव येथील जनसभेला संबोधित केलं. दरम्यान, शाह भाजप-शिवसेनेवर काही चर्चा करणार का किंवा युतीची काही घोषणा करणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार का याबाबतही अनेक अंदाज लावले गेले. मात्र, शाह यांच्या दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीचा कोणताही अधिकृत उल्लेख नाही.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.