पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अमित शाहांची पुणेकरांना ग्वाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही पुणेकरांना दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा पुणे दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अमित शाहांची पुणेकरांना ग्वाही
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:24 PM

पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन केलं. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar)  पुतळ्याचं लोकार्पण शाह यांनी आज केलं. त्यानंतर बोलताना शाह यांनी पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही पुणेकरांना दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा पुणे दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला. पुण्याला लवकरच मेट्रो मिळेल. स्मार्ट सिटीसाठी 100 कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिले. मुळा मुठा निधी संवर्धनासाठी 110 कोटीचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टप पुण्यातच आले आहेत. पुण्याच्या विकासासाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही.

अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

शाह यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ‘बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारत रत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला’, असा घणाघात शहा यांनी केला.

शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं

जेव्हा देशात अंधारयुग होतं. आशेचा एक किरणही दिसत नव्हती. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणंही जेव्हा कठिण होतं. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचं सौभाग्य मिळालं, असं त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या, असंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Goa Liberation Day | 60व्या मुक्तिदिनी गोव्याला पंतप्रधानांनी दिलं 600 कोटीचं गिफ्ट, गोव्याला उद्देशून मोदी म्हणाले की…

कर्जत नगर पंचायत निवडणूक : रोहित पवारांची सोमय्यांवर खोचक टीका, चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.