Amit shah Meets Venkaiah Naidu : महाराष्ट्रात सत्तांतरण? केंद्रीय गृहमंत्री उपराष्ट्रपतींच्या भेटीला, महाराष्ट्रासह राजधानीत घडामोडींना वेग

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.

Amit shah Meets Venkaiah Naidu : महाराष्ट्रात सत्तांतरण? केंद्रीय गृहमंत्री उपराष्ट्रपतींच्या भेटीला, महाराष्ट्रासह राजधानीत घडामोडींना वेग
अमित शाह, जेपी नड्डा उपराष्ट्रपतींच्या भेटीलाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 1:14 PM

दिल्ली :  महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडण्याची शक्यताय. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यासह अवघ्या देशात्या नजरा महाराष्ट्राच्या राजकारणावर लागल्या आहेत. शिवसेनेचे (shiv sena) एक-दोन नव्हे तर तब्बल 35 आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रात सत्तांतरणाच्या चर्चेला वेग आलाय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यामुळे आता काय घडामोडी घडता हे पाहणं महत्वाचं ठरेल.

शिवसेना खासदारांची संध्याकाळी बैठक

राज्यातील शिवसेनेतील फुटीच्या राजकारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत. एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी उघड बंड पुकारल्यानंतर आता शिवसेनेनं राज्यातील सर्व खासदारांची बैठक आयोजित केली आहे. वर्षा निवासस्थानावर ही बैठक होईल, अशी माहिती नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘वर्षा’वर दोघे आमदार पोहोचले

महाराष्ट्रातील नॉट रिचेबल आमदारांचा माग काढत शिवसेनेच्या वतीनं त्यांना वर्षा निवासस्थानावर आणलं जात आहे. वर्षा निवासस्थानावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती आहे. अस्थिर होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला वाचवायची रणनीती आखली जात आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदारांमध्ये आलेली बंडखोरीची लाट थोपवणं. त्यामुळे एकनाथ शिंदेंप्रमाणे बंडखोरी करू पाहणाऱ्या आमदारांना शोधून वर्षा निवासस्थानावर आणलं जात आहे. यात आज संजय राठोड आणि दादा भुसे यांनाही आणलं गेलं. मुंबईतील हॉटेल सेंट रेगीन्स परिसरात हे आमदार होते. त्यांना शोधण्यास शिवसेनेला यश आलं असून आता वर्षा निवासस्थानावर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

हॉटेलबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे हे काल सायंकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सुरतमधील हॉटेल  ली-मेरिडिअनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाच्या वतीने  करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर एकनाथ शिंदे हे एखाद्या दुसऱ्या पक्षाची घोषणा करू शकतात असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. शिंदे हे ज्या हॉटले ली-मेरिडिअनमध्ये मुक्कामाला आहेत, त्या हॉटेलबाहेरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.