ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेच्या वर्चस्वाला हादरा, पक्षश्रेष्ठी राणेंवर खुश; अमित शाह कोकणात येतलेत

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्याच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. | Amit Shah

ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेच्या वर्चस्वाला हादरा, पक्षश्रेष्ठी राणेंवर खुश; अमित शाह कोकणात येतलेत
भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी कोकणात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली.
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 3:45 PM

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah) येत्या 6 फेब्रुवारीला कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. (BJP leader Amit Shah will visit Konkan on 6th February)

सध्या दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अमित शाह यांचा हा कोकण दौरा अनिश्चित मानला जात होता. मात्र, आता अमित शाह यांनी 6 फेब्रुवारीला कोकणात येण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्याच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपला लक्षणीय यश मिळाले होते. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वामुळे शिवसेनेच्या कोकणातील या वर्चस्वाला आव्हान देणे भाजपला जमले, असे बोलले जात होते. त्यामुळे सध्या भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नारायण राणे यांना वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था बहाल केली होती. त्यामुळे नारायण राणे यांचे भाजपमधील वजन वाढल्याचे बोलले जात आहे.

कोकणात काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, संजय राऊतांची कबुली

ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणाताही काही भागांमध्ये शिवसेनेची पडझड झाली, अशी कबुली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती. विदर्भ-मराठवाड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने झेप घेतली आहे, असं सांगताना कोकणात शिवसेनाच आहे, पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

नारायण राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने ही सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेव्यवस्थेनुसार 12 सी. आय. एस. एफचे जवान राणेंच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असणार आहे. महाराष्ट्र सरकारनं भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता थेट केंद्राकडून सुरक्षा दिली गेली आहे.

संबंधित बातम्या:

मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती: नारायण राणे

ठाकरे सरकारकडून सुरक्षाकपात, नारायण राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

‘मला धक्का देणारा अजून जन्मला नाही’, नाईकांनी डिवचल्यानंतर राणे कडाडले

(BJP leader Amit Shah will visit Konkan on 6th February)

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.