गुजरातचे गृहमंत्री ते देशाचे गृहमंत्री, अमित शाहांचा प्रवास

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात या मंत्र्यांमध्ये खातेवाटप झालं. यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी हे पद राजनाथ सिंह यांच्याकडे होतं. […]

गुजरातचे गृहमंत्री ते देशाचे गृहमंत्री, अमित शाहांचा प्रवास
Follow us
| Updated on: May 31, 2019 | 4:58 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात या मंत्र्यांमध्ये खातेवाटप झालं. यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी हे पद राजनाथ सिंह यांच्याकडे होतं. नव्या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्र्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आधीच्या सरकारमधील संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे वित्तमंत्र्यालयाची जबाबदारी आली आहे. तर एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्र्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच सरकारच्या सर्वात महत्त्वपूर्ण रक्षा समिती सीसीएसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह हे चार मंत्रीही प्रमुख राहतील.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पद आल्याने आता ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तीशाली मंत्री असतील. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान देशाची धुरा ही अमित शाहांच्या हातात राहील. अमित शाह यांच्या एका छोट्याश्या शेअर ब्रोकर ते आज देशाच्या गृहमंत्री पदापर्यंतचा प्रवास अतिशय रंजक राहिलेला आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अमित शाह त्यांच्यासोबत काम करत आहेत. मोदी-शाहची जोडी म्हणजे जय-वीरुची जोडी म्हणून ओळखली जाते.

अमित शाहांच्या या अनोख्या प्रवासातील काही महत्त्वाच्या गोष्टी

  • अटल-अडवाणीनंतर देशात मोदी-शाहची जोडी खूप गाजली. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अमित शाह यांना भाजपचे चाणक्य म्हटलं गेलं.
  • यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अमित शाह हे गुजरातच्या गांधी नगर मतदारसंघातून साडे पाच लाख मतांनी निवडूण आले. या मंतदारसंघात त्यांनी लालकृष्ण अडवाणीचाही रेकॉर्ड तोडला.
  • 2010 मध्ये अमित शाहांना शोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणी तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांना गुजरातच्या बाहेर राहण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला होता.
  • त्यानंतर 2014 मध्ये भाजप सरकारच्या काळात हे भाजप अध्यक्ष झाले.
  • 1989 ते आतापर्यंत अमित शाह यांनी 29 निवडणुका लढवल्या आहेत. यापैकी कुठल्याही निवडणुकीत ते पराभूत झालेले नाही.
  • अमित शाह गुजरातमधून सलग चारवेळा आमदार होते. 1997, 1998, 2002 आणि 2007 मध्ये गुजरातमध्ये आमदार होते.
  • अमित शाहांनी एकावेळी तब्बल 12 मंत्रालयं सांभाळली आहेत. गृह, कायदा-सुव्यवस्था, तुरुंग, सीमा संरक्षण, नागरिक रक्षा, उत्पादन, वाहतूक, निषेध, होमगार्ड, ग्राम संरक्षक दल, पोलीस हाऊसिंग आणि संसदीय कामकाज मंत्री ही 12 मंत्रालयं अमित शाहांनी सांभाळली आहेत.
  • अमित शाह यांच्या नेतृत्त्वात भाजपने महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, आसाम येथे 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्यासोबतच दिल्ली, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्येही भाजप जिंकली होती.

अमित शाह यांच्याविषयी थोडं

अमित शाह यांचा जन्म 22 ओक्टोबर 1964 मध्ये गुजरातच्या एका संपन्न वैष्णव परिवारात झाला. त्यांनी एक विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात पाऊल ठेवलं. 1986 मध्ये अहमदाबाद येथे अमित शाह आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.