मुंबई : एकीकडे शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला असताना दुसरीकडे अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सध्या कोकण पिंजून काढत आहे. अमित ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोकणाच्या राजकारणात सध्या नवी समीकरणं तयार होताना दिसत आहे. कारण मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांची भेट घेतलीय. आता ठाकरे पुत्र (Raj Thackeray) आणि राणे पुत्र भेटल्यावर या भेटीची चर्चा तर होणारच. आगामी काळात अनेक महत्वाच्या निवडणुका आहेत. त्यासाठी मनसेने आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास राज्याच्या राजकारणात नवा मोड येऊ शकतो. याचा फायदा दोन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या भेटीला पोहोचल्याने आता कोकणाच्या राजकारणात काय बदल होणार? असाही सावल विचारण्यात येत आहे. काही तासांआधीच राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी अमित ठाकरे पोहोचले होते.अमित ठाकरे यांचा कोकण दौरा हा बऱ्याच दिवसांचा असून आजच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच ठाकरे यांनी सर्वांना धक्का देत नितेश राणेंची भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र संघटनेच्या कामासाठी दौऱ्यावर असलेल्या या भेटीगाठीत राजकीय होणार नाही असे होणारच नाही. दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा मजकूर मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
अमित ठाकरे यांच्या राजकीय भेटींचा सपाटा हा सध्या कोकणात सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथे झाला. श्री. अमितजी ठाकरे यांनी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात संवाद बैठका घेतल्या, अशी माहिती मनसेच्या ट्विटरवरून देण्यात आली आहे. आता या भेटीगाठी राजकारणाची समीकरणं कशी बदलणार? हे तर आगामी काळातच कळेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथे झाला. श्री. अमितजी ठाकरे यांनी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात संवाद बैठका घेतल्या. pic.twitter.com/Va1v4e7c8W
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 6, 2022