सांगली : अमित ठाकरे (Amit Thackeray Sangli) सध्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, शिराळा तालुक्यातील सावंतवाडीच्या (Shirala Sawantwadi) ग्रामस्थांना अमित ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी अमित ठाकरे यांचा ग्रामीण भागातल्या (Rural Area) लोकांना साधा सभ्य आणि नम्रपणा असा वेगळा स्वभाव बघायला मिळाला. त्यावेळी अमित ठाकरे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. लोकांशी चर्चा करीत असताना मी तुमच्या नातवा सारखा आहे असं विधान अमित ठाकरे यांनी केलं. त्याचबरोबर जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन सुध्दा अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
ज्यावेळी अमित ठाकरे यांनी सावंतवाडीतील मनसेच्या शाखेमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी अमित ठाकरे मुख्य खुर्ची वर बसण्याची विनंती केली. परंतु अमित ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या खुर्चीवर जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना बसवलं. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचं मन अमित ठाकरे यांनी जिंकलं.
शिराळा तालुक्याच्या डोंगर कपारीत वसलेलं सावंतवाडी गाव आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्यामुळे विकासापासून वंचित होतं. मनसेच्या स्थापनेपासून सावंतवाडी गावातील लोकांनी मनसेला साथ दिली आहे. यापूर्वी इथल्या ग्रामस्थांनी नागरी सुविधांच्यासाठी मनसेच्या स्टाईलने खळखट्याक आंदोलन सुद्धा केले होते. सलग पंधरा वर्षे मनसेची सत्ता असून अनेक विकासाची कामे या गावात करण्यात आली आहेत. अशा छोट्याशा गावात अमित ठाकरे यांनी दौरा करून ग्रामस्थांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या.