Amol Kolhe : अजित दादांच्या गुलाबी जॅकेटबद्दल अमोल कोल्हे काय म्हणाले?

| Updated on: Jul 19, 2024 | 2:52 PM

Amol Kolhe : "विशाळगड येथे असलेलं अतिक्रमण पावसात हटवण्यात येत होतं. त्यामुळे कोर्टाने त्यावर आक्षेप घेतला. हा निर्णय योग्य आहे, पण यामागे नेमकं राजकारण कोण करतय हा संशोधनाचा भाग आहे" असं अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe : अजित दादांच्या गुलाबी जॅकेटबद्दल अमोल कोल्हे काय म्हणाले?
अमोल कोल्हे, खासदार- शिरूर
Image Credit source: Facebook
Follow us on

निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हाबाबत शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवलं आहे. त्याचवेळी फक्त तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे. त्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो. “निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. येत्या निवडणुकीमध्ये त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. माझ्याच मतदारसंघांमध्ये 28 हजार मतं या संभ्रमामुळे कमी झाली होती. पण आता तसं होणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे जर आधी झालं असतं, तर आणखी छान झालं असतं, आमच्या दोन जागा वाढल्या असत्या” असं अमोल कोल्हे म्हणाले.

“आम्हाला फक्त एवढेच म्हणायचे की, सध्या राज्यामध्ये तीन कावळ्यांच सरकार आहे. महायुती ते तीन कावळे आहेत. भला न बोलो, भला न देखो अशा अवस्थेमध्ये अविर्भावात वागतात आणि एकमेकांसोबतच त्यांची चढाओढ आहे” अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली. अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरही अमोल कोल्हे यांनी मिश्किल टिप्पणी केली. “दादा गुलाबी जॅकेट घालतात. यामागे राज्याचं वातावरण गुलाबी करण्याचा त्यांचा मानस असू शकतो. पण तसं काय होईल असं वाटत नाही, जॅकेट घालून राजकारण होत नाही” असं अमोल कोल्हे म्हणाले.

विशाळगड अतिक्रमणाबद्दल काय म्हणाले?

“विशाळगड येथे असलेलं अतिक्रमण पावसात हटवण्यात येत होतं. त्यामुळे कोर्टाने त्यावर आक्षेप घेतला. हा निर्णय योग्य आहे, पण यामागे नेमकं राजकारण कोण करतय हा संशोधनाचा भाग आहे” असं अमोल कोल्हे म्हणाले. मागच्या महिन्यात अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले. महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला.