थँक्यू राजसाहेब : अमोल कोल्हे

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

थँक्यू राजसाहेब : अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Jun 12, 2019 | 6:24 PM

मुंबई : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. सकाळी 11.30 सुमारास अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली याबाबत उत्सुकता होती. त्याचं कारण स्वत: अमोल कोल्हे यांनीच सांगितलं.

अमोल कोल्हे म्हणाले, “ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरे यांच्या सभेचा चांगला इम्पॅक्ट झाला. त्यासाठीच राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी, त्यांची भेट घेतली”

अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता. त्यांनी केलेल्या सभांना प्रचंड गर्दी झाली. मात्र निकाल भाजपच्या बाजूने लागला. पण शिरुर मध्ये अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयात राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा परिणाम दिसून आला, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

पुण्यातील खडकवासला इथे राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली होती. हे सभास्थळ जरी बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलं, तरी त्याचा परिणाम शिरुर, मावळ, बारामती आणि पुणे परिसरात अपेक्षित होता. शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांना राज ठाकरे यांच्या सभेचा फायदा झाला. त्यांनी विजय मिळवला.

डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत, तर राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत. दोघांचेही पक्ष एक नसले तरी ‘मराठी’च्या मुद्द्यावर दोघेजण समान मुद्द्यावर एकत्र येणारे नेते आहेत. शिवाय, दोघांनाही महाराष्ट्रात आपलं स्वतंत्र असं वलय आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

संबंधित बातम्या 

अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर जाणार, ‘राज’भेटीत ‘या’ पाच मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

जिथे राज ठाकरेंची सभा झाली, नेमकं तिथेच सुप्रिया सुळेंना जबर फटका   

 माझा वाघ गेला, ‘गोल्डमॅन’च्या आठवणीने राज ठाकरे गहिवरले! 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.