Video : ‘…तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते’

प्रतापगड येथील अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर कारवाई, अमोल मिटकरी म्हणतात की...

Video : '...तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते'
पाहा नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 8:51 AM

सातारा : प्रतापगडाच्या (Pratapgad) पायथ्याशी असलेली अफझन खान (Afzal Khan) याची कबर चर्चेत आली होती. या कबरीजवळ करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येते आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या कबरीच्या जवळ असलेल्या खोल्या आता जमीनदोस्त करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशानाकडून करण्यात येणाऱ्या या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari on Afzal Khan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर करण्यात येणाऱ्या कारवाईचं त्यांनी स्वागत केलं.

महत्त्वाचं म्हणजे काही जणांनी ही कबर उद्ध्वस्त करावी, अशी मागणी देखील केली होती. मात्र ही मागणी रास्त नसल्याचं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. अमोल मिटकरी यांनी म्हटलं की,…

अफझल खान हा स्वराज्याचा शत्रू होता. अफझल खानाचा वध हा इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. अफझल खानाची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी काही लोकांनी केली होती. पण कबर उद्ध्वस्त केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे आपण ते न करता प्रतापगडावर येणाऱ्या लोकांना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास दिसावा.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध केला होता. त्यानंतर प्रतापगडावरच शिवाजी महाराज यांनी अफझल खानाची कबर बांधण्याचे आदेश दिल्याचे उल्लेख इतिहास अभ्यासकांनी नोंदवले आहेत.

दरम्यान, अफझल खानाच्या कबरीच्या आवारात काही खोल्या उभारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी 19 खोल्या असल्याचंही सांगितलं जातं. या अनधिकृत खोल्यांचं बांधकाम पाडलं जावं, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार अखेर प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

चोख पोलीस बंदोबस्तात अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने हे बांधकाम पाडलं जातंय. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांकडून ही कारवाई केली जातेय.

अफझल खानाच्या कबरीच्या लगत असलेल्या खोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या खोल्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या होत्या. या खोल्यांवर आता प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. हा संपूर्ण भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो.

अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांनीही या कारवाईवेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माध्यमांनाही कबरीच्या पाडकामाच्या जवळ जाण्यास मज्जाव करण्यास आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास जेसीबी, क्रेनच्या मदतीने हे पाडकाम करण्यास सुरुवात करण्यात आलीय.

Non Stop LIVE Update
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.