Marathi News Politics Amol Mitkari Criticized on Bjp leader devendra fadnavis about Mukesh Ambani Gautam Adani
“अहो दाजी, हेच का ते रंजले गांजले?”, अंबानी-अदानींचा फोटो शेअर करत अमोल मिटकरींचा फडणवीसांना सवाल
अमोल मिटकरी यांनी अंबानी-अदानींचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचबरोबर “अहो दाजी,हेच का ते रंजले गांजले?”, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी कालच्या देहूतील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रंजल्या गांजल्यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यांची मदत केली, असं विधान केलं. त्यावरून राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी फडणवीसांना सवाल विचारलाय. मिटकरी यांनी अंबानी-अदानींचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचबरोबर “अहो दाजी,हेच का ते रंजले गांजले?”, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 15, 2022
फडणवीसांकडून मोदींचं कौतुक
गोरगरीबांसाठी योजना राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे वारकरी आहेत. रंजल्या-गांजल्यांसाठी ते अनेक योजना राबवत आहेत. त्यांची खऱ्या अर्थाने सेवा करत आहेत. वारकरी संप्रदायाचे हे सूत्र ते तंतोतंत पाळत असल्याचं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्यामंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे गौरवोद्गार काढले. हा अत्यंत अभिमानाचा सोहळा आहे. शीळा मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातच नाही जगात लोकप्रिय असलेले पंतप्रधान मोदी आलेले आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज, संतगण आणि उपस्थित वारकऱ्यांना जय हरी. स्वताला भाग्यशाली समजतो, म्हणून या प्रसंगी मोदींसोबत मला उपस्थित राहता आलं. मी नितीन महाराजांचे आभार मानतो, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं.
मोदी सरकार सत्तेत आल्यामुळेच अदानी आणि अंबानी ग्रुपचा विस्तार झाला त्यांचा विझनेस वाढला, असा आरोप केला जातो. त्याचा धागा धरत मिटकरींनी फडणवीसांवर टीका केली आहे. अंबानी-अदानींचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचबरोबर “अहो दाजी,हेच का ते रंजले गांजले?”, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.