आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील, अमोल मिटकरींचा इशारा

आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे समोर येतील, असा इशारा अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला. (Amol Mitkari BJP)

आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील, अमोल मिटकरींचा इशारा
चंद्रकांत पाटील आणि अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 6:51 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपला विकासावर, शेतकरी आंदोलन, पेट्रोल डिझेल दरवाढ या मुद्यांवर बोलायला वेळ नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, आम्ही जर तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे पडद्यासमोर यायला वेळ लागणार नाही, असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी भाजपला दिलं आहे. (Amol Mitkari gave answer to Chandrakant Patil and BJP )

भाजपाला विकासावर बोलण्यावर वेळ नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती दिल्याचं सांगितले. मात्र, भाजपला विकासावर, महागाईवर, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलण्यास वेळ नाही. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्यास वेळ नाही. केंद्र सरकारविरोधात असलेला रोष वळण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर टीका टिप्पणी करत विषयाला वेगळं देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. आम्ही तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे समोर यायला वेळ लागणार नाही, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला आहे.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

नरेंद्र मोदींनी लस का टोचली नाही?

अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस का टोचून घेतली नाही, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांसमोर लस टोचून घ्यावी, असं आव्हान दिलं होतं. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी. म्हणजे आमचाही त्यावर विश्वास बसेल. मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. म्हणून आधी मोदींनी मीडियासमोर लस टोचून घ्यावी, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं.

संबंधित बातम्या:

अमोल मिटकरींना कोरोना लसीवर शंका, मोदींनी मीडियासमोर कोरोना लस घ्यावी, मिटकरींचे आवाहन

(Amol Mitkari gave answer to Chandrakant Patil and BJP

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.