काळजी करु नका, अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील: अमोल मिटकरी
अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरुन जावू नये. लवकरच ते बरे होतील आणि महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील, असं अमोल मिटकरी म्हणाले. (Amol Mitkari said Ajit Pawar resume his work after cured from corona)
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लवकरच ते बरे होतील कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. (Amol Mitkari said Ajit Pawar resume his work soon after cured from corona)
गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार त्यांच्या घरी विलगीकरणात होते. नियमित तपासणीसाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरुन जावू नये. लवकरच ते बरे होतील आणि महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू आहेत. ते सध्या आराम करत असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. कोरोनातून लवकर बरे होऊन अजित पवार जनता दरबार घेतील. असंही त्यांनी म्हटले.
अजित पवार यांचे ट्विट
कोरोना संसर्ग झाल्याची माहिती अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवरुन दिली आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काळजी करु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु तो पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे.
संबंधित बातम्या:
Ajit Pawar Corona : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह
Headline | उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण
(Amol Mitkari said Ajit Pawar resume his work soon after cured from corona)