स्वप्निल उमप, अमरावतीः मागील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने वसुलीचे सर्व उच्चांक गाठले. त्या काळात वर्क फ्रॉम होम (Work from home) होते, तसे मंत्रीही वर्क फ्रॉम जेल होते. जेलमध्ये असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नव्हता, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. अमरावतीत (Amravati) विभागातील विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ 12 वर्षांपासून रणजीत पाटील पदवीधर मतदारसंघात चांगलं काम करत आहेत. अनेक वर्षांनंतर पहिल्यादा भाजपाला ही जागा निवडून आणता आली.. आपल्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री होता आले.. सध्याच्या सरकारमध्ये राज्यमंत्री नाही त्यामुळे त्यांचा कारभार आम्हाला पाहावा लागतो.. मी मुख्यमंत्री असताना माझ्या अनुपस्थितीत रणजित पाटील यांनी चांगलं काम तेव्हा केलं. पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. आजही सभागृहात पश्चिम विदर्भाचे प्रश्न ते लावून धरतात.
अमरावती विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेसचे धीरज लिंगाळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे उपस्थितीत धीरज लिंगाळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडी कडून अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक काँग्रेस पक्ष लढवणार आहे. भाजपचे रणजीत पाटील व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात ही लढत होणार आहे…
अमरावतीतील या सभेत खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, यात शंका नाही, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं.
या सभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ पदवीधर आणि शिक्षकाना न्याय देन्यासाठी फडणवीस शिंदे यांचं सरकार यावं लागलं. मागचं सरकार हे फेसबुक लाइव्ह आणि टोमणे सरकार होतं….