दीपाली चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त, आरोपींच्या प्रतिमांचं नवनीत राणांच्या हस्ते होलिकादहन

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या हरीसाल येथील शासकीय निवासस्थानाला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट दिली. (Navneet Rana Deepali Chavan Holi)

दीपाली चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त, आरोपींच्या प्रतिमांचं नवनीत राणांच्या हस्ते होलिकादहन
नवनीत राणांच्या हस्ते होलिका दहन
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 7:37 AM

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी होळीचे दहन केले. वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide) यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींच्या प्रतिमेचे दहन राणा दाम्पत्याने केले. खासदार, आमदार, गावकरी आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Amravati MP Navneet Rana burns effigies of accuse in Deepali Chavan Suicide case on Holi)

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या हरीसाल येथील शासकीय निवासस्थानाला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करत ही दुर्दैवी घटना कशी घडली याची माहिती शेकडो आदिवासी बांधव आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.

या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणारे डीएफओ शिवकुमार आणि सीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्या पुतळ्याचे होळीमध्ये दहन करुन राणा दाम्पत्याने घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणात दोषी असणारे डीएफओ शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपस्थित मेळघाटवासियांनी राणा दाम्पत्याकडे केली.

कर्तव्यदक्ष महिलेच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी

एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागणे, अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे नवनीत रवी राणा म्हणाल्या. यासाठी जबाबदार असणाऱ्या शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कलम 302 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आपण राज्यपाल, केंद्रीय वनमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे वचनही त्यांनी गावकऱ्यांना दिले.

फाशीच झाली पाहिजे, नवनीत राणा आक्रमक

या गंभीर घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी खासदार म्हणून आपण संसदेत आणि आमदार रवी राणा विधानसभेत खंबीरपणे आवाज उचलणार असल्याचं, नवनीत राणांनी सांगितलं. दोषींना फक्त कठोर शिक्षा नव्हे, तर फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Amravati MP Navneet Rana burns effigies of accuse in Deepali Chavan Suicide case on Holi)

नेमकं काय झालं?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. वरिष्ठ डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. चव्हाण यांनी 25 मार्चला गोळी झाडून आयुष्य संपवलं.

संबंधित बातम्या :

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

नवरोबा, आपण बाळाला गमावलं, तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको, दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं

(Amravati MP Navneet Rana burns effigies of accuse in Deepali Chavan Suicide case on Holi)

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.