Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या

देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणासारखा दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी नवनीत कौर राणा यांनी केली आहे. (Navneet Rana on Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

आंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 5:06 PM

अमरावती : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणासारखा दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे. (Navneet Rana on Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

“खासदार नवनीत राणा या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे मुली किंवा महिलांवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ फासावर लटकवून दिलं पाहिजे. या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल करताच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

“देशात अशाप्रकारे अत्याचाराचे कृत्य करणाऱ्या नराधमांना पुढील आठ ते दहा वर्षे जगू शकतात, आमच्यावर कडक कारवाई होत नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात जो किडा आहे तो असाच राहणार आहे. जोपर्यंत आपल्या देशातील कायद्यात बदल होत नाहीत तोपर्यंत हे सतत घडत राहणार आहे,” असे नवनीत राणा म्हणाल्या.

“देशातील केंद्र सरकारने अन्यथा प्रत्येक राज्यात, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांनी दिशा कायद्याची तरतूद केली आहे. जे कोणी असे कृत्य करेल, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे हा कायदा सांगतो. त्यानुसार प्रत्येक राज्याने हा कायदा अमलात आणायला हवा,” असे नवनीत राणा यांनी सांगितले.

“काही महिन्यांपूर्वी वर्ध्यातही अशाचप्रकारची घटना घडली होती. तेव्हाही आम्ही गृहमंत्र्यांनी विनंती केली होती, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेशातील सरकारने दिशा कायद्यामार्फत तरतूद आणली आहे. तसेच आपल्या राज्यातही बदल केला पाहिजे. देशानेही सर्व राज्यात हे लागू करायला हवं. त्यामुळे आपल्या देशात अशाप्रकारे कृत्य करणारे नराधम यापासून दूर राहतील आणि या घटना कमी होतील,” असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. (Navneet Rana on Hathras Uttar Pradesh Gang raped Case)

संबंधित बातम्या : 

UP GANGRAPE CASE | स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.