Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार रवी राणा यांचं कारागृहात अन्नत्याग आंदोलन, तर खासदार नवनीत राणा यांचं कारागृहाबाहेर धरणं!

खासदार नवनीत राणा या आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटू देण्यात आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणं धरलं. त्यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली.

आमदार रवी राणा यांचं कारागृहात अन्नत्याग आंदोलन, तर खासदार नवनीत राणा यांचं कारागृहाबाहेर धरणं!
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 2:02 PM

अमरावती: अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. आजचा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा दिवसही रवी राणा यांना कारागृहात काढावा लागत आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणं आंदोलन सुरु केलं आहे. (MLA Ravi Rana arrested by police, MP Navneet Rana’s agitation outside the jail)

खासदार नवनीत राणा या आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटू देण्यात आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणं धरलं. त्यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. जोपर्यंत रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरु राहणार, असा निर्धार नवनीत राणा यांनी केलाय. तर दुसरीकडे पोलिसांनी अटक केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.

फडणवीसांकडून राज्य सरकारचा निषेध

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध, असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे. ‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’, अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे.

अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेलं वीज बिल माफ करा या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढत रवी राणा यांना अटक केली. त्यानंतर रात्री उशीरा रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या:

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध’, आमदार रवी राणा यांच्या अटकेवरुन फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

आमदार रवी राणांसह 18 शेतकऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल; राणांची रात्र तिवसा पोलीस ठाण्यात

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

MLA Ravi Rana arrested by police, MP Navneet Rana’s agitation outside the jail

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....