शिंदे सरकारच्या निर्णयावर नवनीत राणा खुश…. म्हणाल्या आरती सिंहांना ‘हीच’ शिक्षा

| Updated on: Dec 14, 2022 | 12:07 PM

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, सीमा प्रश्न बाबत शिंदे फडणवीस सरकार सक्षम आहे..

शिंदे सरकारच्या निर्णयावर नवनीत राणा खुश.... म्हणाल्या आरती सिंहांना हीच शिक्षा
नवनीत राणा यांच्या वडिलांना न्यायालयाचा झटका
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः  महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची आनंदी प्रतिक्रिया आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून अमरावतीतील पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Arti Singh) आणि खासदार नवनीत राणा, रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. शिंदे सरकार आल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात त्यांनी आरती सिंह यांची बदली करण्याची मागणी केली होती. रवी राणा यांनी तर त्यांची लवकरच बदली होईल, असं वक्तव्यही केलं होतं.

आता अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची बदली झाली हीच त्यांना शिक्षा आणि डिमोशन आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली. त्या म्हणाल्या, जेवढे क्राइम, खुन खुलेआम झाले. त्यांची बदली त्यानुसार झाली. महिला म्हणून आम्ही सपोर्ट करतो.

पण अशा अधिकारी लोकांना साथ देत नाहीत. त्यांची बदली होते. या बदलीवरून सिद्ध होतं की भ्रष्टाचारी अधिकारी नव्या सरकारमध्ये चालत नाहीत.. या बदलीमुळे अमरावतीकर आणि पोलीस खातं खुश असल्याचंही त्या म्हणाल्या.

अमरावती येथील पोलीस आयुक्त आरती सिंह यांची बदली अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र सीमा बल बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्यांची कामं चालत होती. पण आता सामान्य अमरावतीकर खुश आहे. पोलीस विभागातील लोकही खुश आहेत. दोन-तीन कॉन्स्टेबलनी आरती सिहांच्या दबावामुळे आत्महत्या केली होती, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘ शाईफेक प्रकरणात दोन सरकार मध्ये फरक आहे , चंद्रकांत दादा यांच्या बाबत  307 मागे घेण्यात आला , मात्र अमरावती आयुक्त शाई फेक प्रकरणात उद्धव सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत..

भुजबळ साहेब म्हणतात, शाई फेकण्याने कोणी मरतं का? पण अमरावतीच्या घटनेवेळी भुजबळ साहेब का बोलले नाहीत ? असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, सीमा प्रश्न बाबत शिंदे फडणवीस सरकार सक्षम आहे..