ARMC election 2022 : पुन्हा एकदा अमरावती पालिका काबीज करण्यासाठी भाजपा सज्ज? काँग्रेसनंही कसली कंबर; वाचा, वॉर्ड 24ची स्थिती काय?

सध्या शिवसेनेला (Shivsena) बंडखोरीचे ग्रहण लागले असून अमरावतीतही त्याचा प्रभाव पाहायला मिळतो की बंडखोरांना शिवसेना पुरून उरते, याची उत्सुकता असणार आहे.

ARMC election 2022 : पुन्हा एकदा अमरावती पालिका काबीज करण्यासाठी भाजपा सज्ज? काँग्रेसनंही कसली कंबर; वाचा, वॉर्ड 24ची स्थिती काय?
अमरावती महापालिका, प्रभाग 24Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 8:30 AM

अमरावती : अमरावतीची महापालिका (ARMC election 2022) पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. आता तर राज्यातील सरकारदेखील भाजपाचे आले आहे. त्यादृष्टीकोनातून भाजपा आणि सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे प्रशासनाची लगबगदेखील पाहायला मिळत आहे. कार्यकाळ संपल्याने महापौर (Mayor) तर नाही, त्यामुळे प्रशासकराज सध्या राज्यातील काही महापालिकांमध्ये आहे. अमरावती महापालिकेत 87 नगरसेवक निवडून जाणार गेले होते (2017) . त्यातील 45 नगरसेवक मागील वेळी म्हणजेच 2017ला भाजपाचे निवडून आले होते. तर काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. शिवसेना चौथ्या क्रमांकावर होती. सध्या शिवसेनेला (Shivsena) बंडखोरीचे ग्रहण लागले असून अमरावतीतही त्याचा प्रभाव पाहायला मिळतो की बंडखोरांना शिवसेना पुरून उरते, याची उत्सुकता असणार आहे. एआयएमआयएम चाही याठिकाणी प्रभाव दिसून येत आहे. यंदा 98 जागांसाठी निवडणूक होणार आहे. एकूण 11 जागा वाढल्या आहेत.

प्रभागातील व्याप्ती कशी?

एच. व्ही. पी. एम परिसर, नाथवाडी, माधव नगर, कोल्हटकर कॉलनी, गणेश कॉलनी, लक्ष्मी विहार, छांगाणी नगर, न्यू गणेश कॉलनी, देशपांडे प्लॉट, रवी नगर, दुर्गा विहार, रेणुका विहार, कृष्णार्पण कॉलनी, रवीकिरण कॉलनी अशी व्याप्ती अमरावती महानगरपालिकेतील प्रभाग 24मधील आहे. तर आनंद नगरडी. पी. रोड, ड्रीम प्लाझा अपार्टमेंट, दिल्ली पब्लिक स्कूल आदी महत्त्वाचा परिसर आहे.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 24 मधील एकूण लोकसंख्या 21,796 इतकी आहे. यात अनुसूचित समाजाची संख्या 1492 असून अनुसूचित जमातीची संख्या 494 इतकी आहे. 2021ला जनगणना झालेली नाही. त्यामुळे आधीच्याच लोकसंख्येत अतिरिक्त संख्यागृहीत धरण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रभाग 24 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजपा
काँग्रेस
एमआयएम
शिवसेना
इतर

प्रभाग 24 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजपा
काँग्रेस
एमआयएम
शिवसेना
इतर

प्रभाग 24 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजपा
काँग्रेस
एमआयएम
शिवसेना
इतर

कोण मारणार बाजी?

पक्षीय बलाबल पाहता अमरावती महापालिकेत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. 2017साली राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार होते. यावेळी भाजपाचेच सरकार आहे. मात्र शिवसेनेतील फुटलेला गट त्यांच्यासोबत आहे. त्याचा यावेळच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.

आरक्षण कसे?

प्रभाग क्रमांक 24 अ हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी यावेळी राखीव ठेवण्यात आला आहे. ब आणि क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मागील वेळी असलेले आरक्षण यावेळी असणार नाही. चार सदस्यीय वॉर्ड रचना यावेळी तीन सदस्यांची झाली आहे. त्यामुळे आरक्षणातही बदल झाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.