Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंना आव्हान… मतदारसंघात या अन् लोकसभा निवडणूक लढवून दाखवा; कुणी दिलं ओपन चॅलेंज?

MLA Ravi Rana on Uddhav Thackeray ; उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान, आदित्य ठाकरेंनाही मतदारसंघात पाठवण्याचं चॅलेंज, तर संजय राऊतांच्या निवडणूक लढवण्याच्या इराद्यावर टीका; पाहा कुणी दिलंय चॅलेंज

ठाकरेंना आव्हान... मतदारसंघात या अन् लोकसभा निवडणूक लढवून दाखवा; कुणी दिलं ओपन चॅलेंज?
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 1:47 PM

अमरावती | 22 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान देण्यात आलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघ आणि निवडणुकीची चिंता करू नये. त्यांनी स्वतः या ठिकाणी निवडणूक लढवावी, असं चॅलेंज आमदार रवी राणा यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: यावं अन्यथा आदित्य ठाकरे यांना अमरावतीला पाठवावं. मग बघूया काय होतं ते. कारण अमरावतीच्या जनतेवर आमचा विश्वास आहे. इथली जनता आमच्यासोबत आहे, असंही रवी राणा म्हणालेत. खासदार संजय राऊत यांच्या निवडणूक लढण्याच्या इराद्यावरही रवी राणा यांनी भाष्य केलं आहे.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. स्वत: संजय राऊत यांनीही पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू असं म्हटलं आहे. त्यावर संजय राऊत राज्यसभेवर मुश्किलने निवडून गेले आहेत. त्यांनी जनतेमध्ये जाऊन कामं केले पाहिजे, असं रवी राणा म्हणालेत.

पाच वर्ष संपल्यानंतर निवडणुकीची तयारी करणं आणि जनतेमध्ये जाऊन काम करण्यात फरक आहे. निवडणुकीची तयारी करण्यापेक्षा कोणत्या जिल्ह्यात निवडणूक लढवणार हे जाहीर केलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांना रवी राणा उद्देशून म्हणालेत.

अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील, असे बॅनर ठिकठिकाणी लावले जात आहेत. त्यावरही रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुणाचे कितीही पोस्टर लागले जोपर्यंत ते मुख्यमंत्री होत नाही तो पर्यंत ते केवळ पोस्टरच राहणार, असं रवी राणा म्हणाले.

खासदार नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली आहे. यावर बोलताना नवनीत राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणी पोलीस आयुक्तांना आम्ही तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिली आहे. या धमकी प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. ज्याप्रकारे धमकी येतात त्या प्रकारे कोणत्यातरी गॅंगला सुपारी दिली आहे का? कोणत्या संघटनेचा यात हात आहे का? हे तपासले पाहिजे, असं रवी राणा म्हणालेत.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.