Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार?; नाना पटोले यांच्या ‘या’ विधानाने लक्ष वेधलं

Nana Patole on Baramati Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सर्वच पक्षांची जोरदार तयारी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका काय?; बारामती मतदारसंघाबाबत नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...

Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार?; नाना पटोले यांच्या 'या' विधानाने लक्ष वेधलं
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 11:14 AM

स्वप्नील उमप, प्रतिनिधी- टीव्ही 9, अमरावती | 11 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी एक असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतची महत्वाची बातमी आहे. हा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता या मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार का? असा प्रश्न चर्चेत आहे. याला कारण ठरलंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं एक वक्तव्य. बारामतीमध्ये आमचे कार्यकर्ते दावा करत आहेत. तानाशाही व्यवस्थाला उलथून टाकायची आहे. मेरिडच्या आधारावर जागा वाटप होणार आहे. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचा दावा खोडलेला नाही. बारामतीमध्ये देखील आमचे कार्यकर्ते दावा करत आहेत, असं नाना पटोले म्हणालेत. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे बारामती मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. नाना पटोले यांच्या स्वागताचे बॅनर अमरावती शहरात लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील 4 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघाचा नाना पटोले आढावा घेत आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नाना पटोले चर्चा करणार आहेत. अमरावती विभागातील आजी माजी खासदार आमदार बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आढावा घेत आहेत.

राज्यभरात आम्ही आढावा घेत आहोत. आज अमरावती विभागाचा आढावा घेत आहोत. हा संघटात्मक आढावा आहे. सध्या लोकांसमोर काँग्रेस हाच एक चांगला पर्याय आहे. अमरावती हा वैचारिक लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारा हा जिल्हा आहे. खालच्या पातळीवर जाऊन चारित्र्यवर बोलणं सुरू आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी अमरावती जिल्ह्याचा तमाशा थांबवावा, हीच आग्रहाची विनंती आहे, असं नाना पटोले म्हणाले.

हिंमत असेल तर सरकारने जातिनिहाय जनगणना करावी. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्स व्यवसाय होऊ शकत नाही. योग्य वेळी आम्ही पुरावे देऊ. राज्यकर्ते आणि पोलिसांमुळे तरूण तरुण देवभूमी नाशिकमध्ये ड्रग्स घेत आहे.अनेक तरुण तरुण आत्महत्या करत आहेत. यंदा पाऊस चांगला नाही पडला. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. हे सरकार दुष्काळ जाहीर करणार नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.