संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

Yashomati Thakur Death threat : संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 11:55 AM

अमरावती | 31 जुलै 2023 : माजी मंत्री, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून ही धमकी देण्यात आली आहे.  असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना दिला आहे. या धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आमदार यशोमती ठाकूर या देखील आक्रमकपणे या मुद्द्यावर बोलताना दिसल्या. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. टरा टरा फाडून टाकला. हरामखोर बाई कोण आहे स्पष्ट करा, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

दाभोळकर असाच ओरडत होता. एकदिवस जन्नतमध्ये पाठवला. धारकरी कोथळा बाहेर काढतात, हे लक्षात असू द्या, असं म्हणत ठाकूर यांना धमकावण्यात आलं आहे.

आपल्या तत्वांशी, विचारांशी तडजोड करू नका. लक्षात ठेवा इतिहास गद्दारांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आज इतिहासाने आपल्यावर एक जबाबदारी सोपवलीय. आज जर आपण चुकलो तर हा देश आपल्याला माफ करणार नाही. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर द्वेष पेरणाऱ्यांना थारा देऊ नका. जय हिंद!, हे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. त्या ट्विटवर केलेल्या कमेंटमधून ही धमकी देण्यात आली आहे.

यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

तुम्हाला काय करायचंय ते करा. मला मारायचं असेल तर मारा पण संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मी विरोध करत राहणार. पण माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

सुरक्षेत वाढ

जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीनंतर ठाकूर यांच्याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनाही धमकी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनाही धमकी देण्यात आली आहे. चव्हाण यांच्या कराडमधील राहत्या घरी धमकीचा फोन आला होता. त्यानंतरपृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.