Amravati Violence : अमरावती हिंसाचारानं हादरली, पालकमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, बैठकीत शांततेसाठी मंथन होणार

अमरावती शहरातील बचत भवन इथं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शहरातील तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी या बैठकित मंथन होणार आहे. या बैठकीला भाजप नेते, मुस्लिम प्रतिनिधी, आमदार, खासदार आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

Amravati Violence : अमरावती हिंसाचारानं हादरली, पालकमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, बैठकीत शांततेसाठी मंथन होणार
यशोमती ठाकुर, पालकमंत्री, अमरावती
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 8:56 PM

अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेवरुन राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये शुक्रवारी मुस्लिम बांधवांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी तिनही शहरात अचानक जमावाकडून दगडफेक करण्यात आलीय. अनेच वाहनं, दुकानांचीही तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आज भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. आजही अनेक भागात जमावाकडून दगडफेक, तोडफोड, आग लावण्याच्या घटना घडल्या. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. (Yashomati Thakur called an all-party meeting to stop the violence in Amravati)

अमरावती शहरातील बचत भवन इथं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शहरातील तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी या बैठकीत मंथन होणार आहे. या बैठकीला भाजप नेते, मुस्लिम प्रतिनिधी, आमदार, खासदार आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एसटी संपावरून लक्ष हटवण्यासाठी हिंसाचार घडवला- दरेकर

अमरावती जिल्ह्यात आज भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारात भाजपचे कार्यकर्ते नव्हते. जनता स्वस्फूर्तीने या बंदमध्ये उतरली असून, या बंदमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते ही सहभागी झाले होते,असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात एसटी कामगारांचा बंद सुरू आहे. सरकारने अपयश झाकण्यासाठी व एसटी बंद वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलीकी प्रवृत्तीचा वापर करून वातावरण गढूळ केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळावर प्रवीण दरेकर व माजी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

महागाईवरचं लक्ष वळवण्यासाठी अमरावती भडकवली – संजय राऊत

देशातील प्रमुख प्रश्नांवरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी भाजपने अमरावतीत आग भडकवण्याचे काम सुरू केल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. अमरावतीत काल झालेल्या हिंसाचारातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आज भाजपचे कार्यकर्ते आणि भला मोठा जमाव रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे शहरात दोन गटांतील तणावामुळे हिंसाचाराच्या घटना घडत आहे. यामुळे अमरावतीत दंगलसदृश्य परिस्थिती असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे, असं संजय राऊथ म्हणाले.

महागाईविरोधातल्या आंदोलनात बोलताना संजय राऊत म्हणाले, महागाईविरोधातील लक्ष वळवण्यासाठी भाजप विविध फालतू मुद्द्यांना हात घालतं. महागाईचा प्रश्न विचारला तर भारत-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, हिंदू-मुसलमान असे प्रश्न पेटवले जातात. या प्रश्नांशी सामान्य जनतेचा काहीही संबंध नाही. पण जनतेला या मुद्द्यात अडकवून ठेवलं जातं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

इतर बातम्या :

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये, पटोलेंचं आवाहन; भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

Video : आधी मुख्यमंत्र्यांवर टीका, मग सोमय्यांना ‘त्या’ वक्तव्याची उपरती!

Yashomati Thakur called an all-party meeting to stop the violence in Amravati

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.