राज्यात कुठेही दंगल झाली तरी भाजपच्या माथी लावण्याचं ठाकरे सरकारचं काम, भाजपचा आरोप
अमरावती शहरातील हिंसाचार प्रकरणानंतर सायबर क्राईमचा अहवाल समोर आलाय. त्यात भाजप प्रणित हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या अहवालावर भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. राज्यात कुठेही दंगल झाली तरी ती भाजपच्या माथी लावण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केलाय.
अमरावती : शहरातील हिंसाचार आणि तोडफोड प्रकरणावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अमरावती शहरातील हिंसाचार प्रकरणानंतर सायबर क्राईमचा अहवाल समोर आलाय. त्यात भाजप प्रणित हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या अहवालावर भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. राज्यात कुठेही दंगल झाली तरी ती भाजपच्या माथी लावण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केलाय. (BJP spokesperson Shivrai Kulkarni criticizes Mahavikas Aghadi government)
सादर करण्यात आलेला अहवाल खोटा आहे. महाराष्ट्रात कुठेही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतं आणि ती दंगल भाजपच्या माथी लावतात. राज्य सरकारने झालेल्या घटनेची चौकशी करावी. हिंसाचारप्रकरणात कुणालातरी जबाबदार धरणं हा अमरावतीच्या अस्मितेचा अवमान करणं आहे. तर लोकांचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे, असं कुळकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
अमरावती हिंसाचार हा सुनियोजित कट- यशोमती ठाकूर
अमरावती हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय. अमरावतीमध्ये आम्ही शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदू आणि मुस्लिम अशा सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावत आहोत. अमरावतीमध्ये जे घडलं तो एक कट होता आणि हा कट रचला गेला होता. अॅक्शनला रिअॅक्शन देण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडला. ज्यांनी घडवलं तेच आरोप करत सुटले आहेत. सरकारचा प्रयत्न परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सुरु आहे. इंटरनेट सेवा आज किंवा उद्यापर्यंत सुरु व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.
‘महाराष्ट्रातील वातावरण खराब करणं योग्य नाही’
हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मत मांडलंय. अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये काही समस्या उद्भवली. त्रिपुरात काही घडलं त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही. महाराष्ट्रात हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणं योग्य नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब करणं योग्य नाही. त्याचा व्यापारावर मोठा परिणाम होतो. ज्यांची दुकानं फोडली त्यांचा काय दोष? त्रिपुरातील घटनेत व्यापाऱ्यांचा काय दोष? व्यापाऱ्यांचं काम नुकसान होत असेल तर त्याबाबत सरकारनं धोरण आखणं गरजेचं आहे. हिंसक घटनांमध्ये दुकानांचं नुकसान झालं. त्यांच्या मदतीसाठी धोरण आखण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.
इतर बातम्या :
शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, तर गडकरीचं कौतुक; हिंसाचाराच्या घटनेवरही भाष्य
पेट्रोल-डिझेलवर सेस वाढवून केंद्र सरकारने राज्याचे 30 हजार कोटी हडपले, नाना पटोलेंचा घणाघात
BJP spokesperson Shivrai Kulkarni criticizes Mahavikas Aghadi government