‘ज्यांना स्वत:च्या मुलीला सीएम करायचं आहे ते लोक तुमच्या …,’ काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?

| Updated on: Sep 28, 2024 | 8:29 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की अशा घटना घडत राहतात.मानसिक तणावात असलेल्या तोडफोड करणाऱ्या त्या महिलेला ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्यांच्याकडे थोडं सहानुभूतीने पाहिल पाहिजे असे त्यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले.

ज्यांना स्वत:च्या मुलीला सीएम करायचं आहे ते लोक तुमच्या ..., काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
Follow us on

अमृता फडणवीस यांनी नागपूर येथील लाडकी बहीण मेळावा येथे जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपाचे सरकार महिलांसाठी अनेक योजना आणून त्यांना फायदा मिळवून देत आहे. लाभार्थी महिलांना त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. महाराष्ट्र पुरोगामी राहण्यासाठी महिलांना पुढाकार घ्यावा, महिला स्वत:सोबत दुसऱ्यांना देखील उभ्या करतात. कुटुंबाला आधार देतात. तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी होईल.महाराष्ट्रात अनेक विकासकामे झाली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर , रोजगार यामुळे सुबत्ता आपल्या घरापर्यंत येणार असल्याने केंद्रात जसे नरेंद्र मोदी यांना निवडून आणले तसे राज्यात भाजपाला भक्कम करा असे आवाहनही अमृता फडणवीस यांनी केले.

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी असे स्रिया म्हणू शकतात. पण माझं कुटुंबच माझी जबाबदारी हे एक मोठा नेता म्हणत असेल तर अडचण आहे अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अमृता फडणवीस यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की,पण देवेंद्र फडणवीस हे असं कधी म्हणत नाही, त्यांनी संपूर्ण महिला, शेतकरी, मुलांची जवाबदारी घेतली आहे,त्यासाठी ते 24 तास काम करतात. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. महायुती सरकार आलं तर आपण पुढे विकास करू शकतो असेही त्या म्हणाल्या.

असे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीत

कोणी असा नेता निवडून आणणार नाही ज्यांना आपले घर भरायचे आहे. ज्यांना मुलीला सीएम करायचं आहे, पॉवरमध्ये ठेवायचे आहे असे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीत. लोकांना पुढे न्यायचे आहे असे उमेदवार नेते निवडून आले पाहिजे असाही टोला यावेळी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. नागपूर दक्षिण- पश्चिम मतदार संघामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहीण असो की अन्य कुठल्या योजना असो, सरकारने काम केल्याचं प्रेम लोकांमध्ये दिसून येत आहे असेही त्या म्हणाल्या.