Amruta Fadnavis : पुण्यातील दहीहंडीला अमृता फडणवीसांची हजेरी, गाणं सादर केल्यानंतर उपस्थितांमध्ये उत्साह संचारला

काल राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. मुंबई आणि पुण्यात अनेक सेलिब्रिटींनी दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

Amruta Fadnavis : पुण्यातील दहीहंडीला अमृता फडणवीसांची हजेरी, गाणं सादर केल्यानंतर उपस्थितांमध्ये उत्साह संचारला
Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 2:54 PM

पुणे –  राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर दहीहंडी उत्सव (Dahi Handi 2022) उत्साहात साजरा झाला. राज्यभरात काल उत्साहाचं वातावरणं होतं. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात दहीहंडी उत्सवाचं मोठं आयोजन केलं होतं. त्यामुळे तिथं दिवसभर सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. तसेच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुण्यातील दहीहंडी महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी तिथं त्यांनी उपस्थित लोकांना आणि गोविंदाना दहिकाल्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी दोन गाण्याची कडवी देखील गायली आहेत. त्यानंतर उपस्थित लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. पुण्यातील बानधन येथील एका दहीहंडीला त्यांनी रात्री उशिरा उपस्थिती लावली.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

काल राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. मुंबई आणि पुण्यात अनेक सेलिब्रिटींनी दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. काल पुण्यात अमृता फडणवीस येणार असल्याने तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांसह गोविदा पथकांची गर्दी होती. बावधनमध्ये देखील पुण्यातील अनेक मान्यवर मंडळींनी दडीहंडी उत्सवाला भेट देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या होत्या. ज्यावेळी अमृता फडणवीस यांची एन्ट्री झाली. त्यावेळी तिथं कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा उत्साह पसरला होता. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी यावर्षीच्या सरकारने सगळ्यांना सुट्टी जाहीर केल्याचे देखील सांगितले. तसेच राज्य सरकारने नवीन सुरु केलेली योजना देखील सांगितली. आजचा दिवस आपण जल्लोषात साजरा करुया. आज विरोधकांवरती टीका करण्याचा दिवस नाही असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

हे सुद्धा वाचा

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाला

यंदा दहीहंडी आणि गणेश चतुर्थीसह धार्मिक सण साजरे करण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याची घोषणा राज्य सरकारने गेल्या महिन्यात केली होती. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. साहसी खेळाचा टॅग या इव्हेंटमधील तरुण सहभागींना क्रीडा कोट्याअंतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी देईल. त्याचबरोबर जखमी झालेल्या गोविंदावरती मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.