यशोमती ठाकुरांना माजी मुख्यमंत्री पत्नीचं सडेतोड उत्तर, डोंबिवलीतून प्रतिक्रिया
धमक्या येणं ही देशाची अवस्था आहे, असा आरोप करणारेच खराब दिमाखाचे लोक आहेत, असं दिसतं, असं प्रत्युत्तर यशोमती ठाकुरांना मिळालंय....
गणेश थोरात, डोंबिवलीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धमक्या येणं ही देशाची आणि राज्याची बिघडलेली अवस्था दर्शवतेय, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलं आहे. याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सडेतोड उत्तर दिलंय. काही लोक वेगळ्या डोक्याचे आहेत. यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते. काही खराब डोक्याच्या लोकांच्या दिमाखाची व्यवस्थाच यातून दिसते, असं वक्तव्य अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी केलंय. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यशोमती ठाकूर यांच्याप्रमाणेच अमृता फडणवीस यांनी नीलम गोऱ्हे यांच्या टोमण्यालाही उत्तर दिलं. एकनाथ शसिंदे यांनी मन मोकळं ठेवावं आणि सत्ता देऊन टाकावी, असा सल्ला नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.
गोऱ्हे यांना प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मला वाटत नाही की मुख्यमंत्री अपात्री दान करतील. ते सद्पात्रीच दान करतील, असा विश्वास आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, चिन्हाचा इशू आता इलेक्शन कमीशनकडे आहे. निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेईल. बाकी पोटनिवडणुका असो की बीएमसी निवडणूका… यापुढे आपल्याला प्रगतीचं राजकारण करायचं आहे.
डोंबिवलीमध्ये दोन गरबा उत्सवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी डोंबिवलीत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याच्या सावळाराम क्रीडा संकुल मैदानात आयोजित नमो रमो दांडिया उत्सवात सहभागी झाल्या. यावेळी अमृता यांनी गाणं गायलं. तसेच ढोल वाजवून आनंद साजरा केला.