शिवसेनेचा ‘शवसेना’ उल्लेख, अमृता फडणवीसांचा पुन्हा बोचरा वार, बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल आभार

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख शवसेना असा केला आहे.

शिवसेनेचा 'शवसेना' उल्लेख, अमृता फडणवीसांचा पुन्हा बोचरा वार, बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल आभार
आरेतील जंगल वाचवण्यासाठी मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 3:23 PM

मुंबई :  बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election) एनडीएने (NDA) बाजी मारत सत्ता राखण्यात यश मिळवलं. तसेच या निवडणुकात भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारत 75 जागा मिळवल्या. याचवेळी बिहार निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेची पुरती धूळधाण झाली. यावरुनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadanvis) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) डिवचलं आहे. (Amruta Fadanvis Slam Shivsena After bihar Election Result)

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केला आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद.., असंही अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

बिहार निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतला काही सेकंदाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. हाच व्हिडीओ ट्विट करत अमृता यांनीही शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत शिवसेनेची जोरदार खिल्ली उडवली आहे. “शिवसेनेने 50 जागा लढवूनही त्यांना भोपळाही फोडता आला नाही, असं सांगताना शिवसेना जरी खाली पडली तरी आपलं बोट वरती आहे असं सांगत फिरते”, अशा शब्दात फडणवीसांनी सेनेला चिमटे काढले आहेत. “शिवसेनेचं सगळ्याच जागांवर डिपॉझिट जप्त झालंय. काही जागा अशा आहेत की त्या जागांवर नोटा पेक्षाही सेनेला कमी मतं मिळाली आहेत”, असं सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा पहिल्यांदा बिहारमध्ये निवडून यायच्या. मात्र यंदा तर एकही जागा राष्ट्रवादीची निवडून आली नाही”, असा टोला त्यांनी शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला लगावला आहे. याचवरुन ‘शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारले’, असा मिश्किल टोला अमृता फडणवीस यांनी लगावलाय.

बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहे.

(Amruta Fadanvis Slam Shivsena After bihar Election Result)

संबंधित बातम्या

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

“देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन”, बिहारमध्ये अनेक जागी नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला निलेश राणेंचा टोला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.