“एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा…” अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर

"अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?" असा प्रश्न MIDC जमीन खरेदी प्रकरणात आपली बाजू मांडताना एकनाथ खडसे यांनी केला होता

एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा... अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 8:35 AM

मुंबई : “अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?” अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला होता. खडसेंच्या प्रश्नाला आता अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. (Amruta Fadnavis answers Eknath Khadse’s question asked after MIDC land accusations)

“तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो !” असे उत्तर मिसेस फडणवीस यांनी ‘टीव्ही9 मराठी’च्या ट्वीटला कोट करुन दिले आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

“जर मी ती जमीन खरेदी केली असेन, तर मी त्यात दोषी आहे. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर मी कसा दोषी? एखाद्या उताऱ्यामध्ये इतर हक्कात कोणाचे नाव असेल, तर तो मालक नाही होऊ शकत. इतकी तर समज माजी मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस) असायला पाहिजे. त्यांना वाटत असेल, तर माझी ना नाही. पण मला समजवू तरी द्या” असे आर्जव खडसेंनी केले. मआयडीसी जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ आली, असा दावा फडणवीसांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. (Amruta Fadnavis answers Eknath Khadse’s question asked after MIDC land accusations)

“एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत” असं खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लीन चिट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनामा द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

अमृता फडणवीसांनी व्यवहार केल्यास देवेंद्रजींच्या पदाचा गैरवापर होतो का? खडसेंचा हल्लाबोल

फडणवीस म्हणाले, घरची धुणी भांडी बाहेर नको, खडसे म्हणतात देवेंद्रजी उत्तम ड्रायक्लीनर!

(Amruta Fadnavis answers Eknath Khadse’s question asked after MIDC land accusations)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.