Marathi News Politics Amruta Fadnavis comment on Uddhav Thackeray Devendra Fadnavis bjp shivsena twitter
Amruta Fadnavis : वजनदारने हल्के को बस… अमृता फडणवीसांची खोचक पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाल्या?
रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता नव्हता, हे सत्य मी सांगितले तर किती मिर्ची झोंबली?. होय, मी बाबरी पाडायला गेलो होतो. त्यांच्या आधी कार सेवेलाही गेलो होतो. त्याच्या आधी काश्मीरलाही गेलो होतो. तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ ??
मुंबई – शनिवारी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. लाखोंच्या संख्येने शिवसैनिक सभेला हजर होते. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा झाली नसल्याने अनेकांना सभेबाबत उत्सुकता होती. उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला त्याचबरोबर भाजपची खेळी सध्या कशा पध्दतीने सुरू आहे हे सुध्दा सांगितले. देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis)वजन इतकं आहे की, ते आयोध्येत बाबरीवरती जरी चढले असते, तरी ती कोसळली असती. त्याला रविवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी देखील उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील एक ट्विट केल आहे. “वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया” ट्विटमध्ये अशा पद्धतीचा आशय लिहिला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट केल्यापासून त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना कमेंट करून विविध प्रश्न विचारले आहे. रविवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली त्यावर आघारीत हे ट्विट आहे.
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया … ?#Maharashtra
रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता नव्हता, हे सत्य मी सांगितले तर किती मिर्ची झोंबली?. होय, मी बाबरी पाडायला गेलो होतो. त्यांच्या आधी कार सेवेलाही गेलो होतो. त्याच्या आधी काश्मीरलाही गेलो होतो. तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ ??, तुमचे राजकारण फाईव्हस्टार पद्धतीचे आहे. जमिनीवर राजकारण करणारे आम्ही आहोत. जब भी देश को फिर ज़रूरत होगी,
फिर कारसेवा करेंगे।. माझं वजन आज 102 किलो आहे. बाबरी पाडली तेव्हा 128 किलो होते. पण, तुम्हाला ही भाषा कळणार नाही. सामान्य माणसाचा एफएसआय 1 पकडला, तर माझा दीड आहे आणि तेव्हा तो अडीच होता. तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल, असा प्रयत्न केलात. पण लक्षात ठेवा, याच देवेंद्र फडणवीसच्या वजनानं तुमच्या सरकारचा बाबरी ढाँचा खाली आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझ्या वजनावर बोललात, असंच मा. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासावे लागले अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवरती केली.
ट्वीटच्या माध्यमातून अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार हल्ला केला. आम्ही सत्तेत असताना कसे वागले पासून आत्ता कसे वागत आहेत इथपर्यंत त्याचे वाभाडे काढले. आज अमृता फडणवीस यांनी त्या वादात उडी घेतली आहे. एक तासापुर्वी त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, “वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया”.
आता शिवसेना त्यांच्या ट्विटला कशा पद्धतीने उत्तर देणार पाहावे लागेल. काल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवरती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती जोरदार टीका केली.