रश्मी ठाकरेंची सामनाच्या संपादकपदी निवड, अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

रश्मी ठाकरे यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा मान मिळाला (Amruta Fadnavis On Rashmi Thackeray) आहे.

रश्मी ठाकरेंची सामनाच्या संपादकपदी निवड, अमृता फडणवीसांचं नवं ट्विट
Follow us
| Updated on: Mar 01, 2020 | 5:29 PM

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात (Amruta Fadnavis On Rashmi Thackeray) आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद सोडलं होतं. त्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याविषयी बरीच उत्सुकता होती. त्यानंतर जवळपास 2 महिन्यानंतर रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांना सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा मान मिळाला (Amruta Fadnavis On Rashmi Thackeray) आहे.

रश्मी ठाकरेंची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी रश्मी ठाकरेंचे कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही रश्मी ठाकरेंचे कौतुक केलं आहे. यानंतर नुकतंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत रश्मी ठाकरेंचे अभिनंदन केलं.

“रश्मी ठाकरे यांचं सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. देशातील महिला आणि समाजातील असंख्य समस्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देशातीला महिलांना उच्चपदावर जाण्याची गरज आहे,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं (Amruta Fadnavis On Rashmi Thackeray) आहे.

‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. याआधी उद्धव ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी होती. मात्र एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चं संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकारी संपादक असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच ‘सामना’ची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर आज (1 मार्च 2020) रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात (Amruta Fadnavis On Rashmi Thackeray) आली.

रश्मी ठाकरे कोण आहेत?

  • शिवसेनेच्या संलग्न संघटनाच्या अध्यक्ष
  • मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष
  • मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष

रश्मी ठाकरे या सक्रीय राजकारणात थेट सहभागी नसल्या तरी त्या शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होत आल्या आहेत. अनेकदा शिवसेनेच्या मंचावरही त्या दिसल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना लाभाचं पद म्हणून सामना संपादक पद सोडावं लागलं. आदित्य ठाकरे यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने तेही लाभाचे पद असल्याने सामानाचे संपादक पद घेऊ शकत नव्हते.

तेजस ठाकरे यांचे वय लहान आहे, त्यांना अजून तितकासा अनुभव नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्तीकडेच हे पद असावे असा विचार करुन रश्मी ठाकरे यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. रश्मी ठाकरे यांची नेहमीच शिवसेनेच्या राजकीय भूमिका ठरवण्यामागे पडद्याआड महत्वाची भूमिका राहिल्याची शिवसेनेत आणि राजकारणात दबक्या आवाजात चर्चा होत असते. आज मुखपत्र सामानाच्या संपादक पदावर नेमणूक झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात (Amruta Fadnavis On Rashmi Thackeray) आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.