Amruta Fadnavis : “देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीसांचं विधान

Devendra Fadnavis : "देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं", असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Amruta Fadnavis : देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं, अमृता फडणवीसांचं विधान
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 10:49 AM

मुंबई : सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. अश्यात देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपद मिळणार नाही आणि ते उपमुख्यमंत्री होतील, हे आधीपासूनच ठरलं होतं का? अशी सध्या चर्चा होतेय. त्यातच याबाबत आपल्याला आधीपासूनच माहिती असल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सांगितलं आहे.”मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट मला याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात”, असं अमृता म्हणाल्या आहेत.

“वेश बदलून भेटी व्हायच्या”

विधीमंडळात बोलताना एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांसोबत गाठीभेटी व्हायच्या. कुणी उठायच्या आत आम्ही आपापल्या घरी असायचो, असं सांगितलं. त्यांच्या या विधाना अमृता फडणवीसा यांनी दुजोरा दिला आहे. “देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही”, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“देवेंद्रजी महाराष्ट्र सेवक”

“देवेंद्रजींना कायम महाराष्ट्राची सेवा करायला आवडतं ते कायम तेच काम करत आले आहेत. याआधी ते आमदार असताना, त्यानंतर मुख्यमंत्री असताना, विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कायम जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला. आता ते सत्तेत आलेत तर ते आताही जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यरत असतील याचा मला विश्वास आहे. एकनाथ शिंदेदेखील 24 तास जनतेच्या सेवेसाठी तयार असतात. त्यामुळे हे दोघे मिळून जरूर महाराष्ट्र हिताची कामं करतील, याची मला खात्री आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.