Rashtrapati Bhavan : मृत गरुडामुळे दिल्ली पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले, राष्ट्रपती भवनात सापडले ट्रॅकिंग डिवाइस लावलेले गरूड

दरम्यान याबाबत नवी दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, शास्त्रज्ञ आणि वन्यजीव विभाग पक्ष्यांच्या जीवनाविषयी माहिती मिळविण्यासाठी वरील उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे हे हेरगिरीचे कोणतेही प्रकरण नाही किंवा तसा संशयही नसल्याचे त्यांनी सांगितले.

Rashtrapati Bhavan : मृत गरुडामुळे दिल्ली पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले, राष्ट्रपती भवनात सापडले ट्रॅकिंग डिवाइस लावलेले गरूड
राष्ट्रपती भवनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:43 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) सोमवारी एका घटनेने तपास यंत्रणांची झोप उडवून टाकली. तर या घटनेमुळे राष्ट्रपती भवनात तैनात असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. राष्ट्रपती भवनाजवळ एक मृत गरुड आढळले असून गरुडाच्या पंखात सॅटेलाईट ट्रॅकिंग डिव्हाईस (Satellite Tracking Device) आढळून आले आहे. ज्यामुळे दिल्ली पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. जोरदार वादळ आणि पावसामुळे गरुड (eagle) जखमी होऊन तिथेच पडले होते. यानंतर राष्ट्रपती भवन संकुलात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब पक्ष्याचा माग काढला आणि त्याची तपासणी केली. त्यावेळी ते मृतावस्थेत आढळले.

सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

काल सोमवारी दुपारी दिल्लीला जोरदार वादळ आणि पावसाने झोडपून काढले. यावेळी राष्ट्रपती भवनात सॅटेलाईट ट्रॅकिंग डिव्हाईस लावलेले एक मृत गरूड सापडे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. यानंतर त्या गरूडाची आणि ट्रॅकिंग डिव्हाइसची माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. माहिती मिळताच स्पेशल सेलसह अनेक सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी त्याची पुर्ण चाचपणी केल्यानंतर याची माहिती एकत्र केली. त्यावर लिहलेल्या तपशिलांच्या आधारे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या वन्यजीव विभागाशी संवाद साधला. त्यावेळी वनविभागाने गरुडाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाइस बसवल्याचे सागितले. सर्व तपासाअंती हेरगिरीचे एकही प्रकरण न सापडल्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हे हेरगिरीचे कोणतेही प्रकरण नाही

दरम्यान याबाबत नवी दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, शास्त्रज्ञ आणि वन्यजीव विभाग पक्ष्यांच्या जीवनाविषयी माहिती मिळविण्यासाठी वरील उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे हे हेरगिरीचे कोणतेही प्रकरण नाही किंवा तसा संशयही नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की, हे जीपीएस नियंत्रित उपकरण असून ते पक्ष्यांचा मार्ग, मुक्काम आदींची माहिती देते. हे गरुड कोणत्या वेगाने उडते याचीही माहिती देते.

हे सुद्धा वाचा

जोरदार वादळ आणि पाऊस

सोमवारी दुपारी जोरदार वादळ आणि पावसामुळे राजधानीत मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली होती. दुपारी 4.45 च्या सुमारास राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांना एक गरुड आवारात पडल्याचे दिसले. बारकाईने पाहणी केली असता त्याच्या पंखाजवळ सॅटेलाइट ट्रॅकिंग यंत्र बसवलेले असल्याचे आढळून आले. यानंतर त्याची माहिती तत्काळ दिल्ली पोलीस आणि सर्व केंद्रीय यंत्रणांना देण्यात आली. मुंबईस्थित वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी सांगितले की, हे सॅटेलाइट यंत्र त्यांनी बसवले आहे.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.