Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारसाहेब, तुम्ही सतत बदलत राहता, आम्हाला प्रश्न पडलाय की तुमचं खरं रूप कोणतं? महाराष्ट्राला कळू द्या- आनंद दवे

Anand Dave : पवारसाहेब, तुमचं खरं रूप कोणतं?- आनंद दवे

पवारसाहेब, तुम्ही सतत बदलत राहता, आम्हाला प्रश्न पडलाय की तुमचं खरं रूप कोणतं? महाराष्ट्राला कळू द्या- आनंद दवे
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 11:36 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्याविषयी एक विधान केलं. त्यावरून त्यांनी घेरण्याचा प्रयत्न होतोय. हिंदू महासंघ आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहे. शरद पवार यांचा एक जुना फोटो शेअर करत हिंदू महासंघ आनंद दवेंनी शरद पवारांना प्रश्न विचारलाय. “तुम्ही खूप बदलत राहता पवार साहेब आम्हालाच प्रश्न पडलाय की खरे पवार साहेब कोणते? 16 मे 1974 रोजी त्यांनी दादर येथील बाबासाहेब पुरंदरे यांनी उभ्या केलेल्या शिवसृष्टी ला भेट दिली तेव्हा तुम्ही त्यांच यांचे भरभरून कौतुक केल ते सुद्धा लेखी आणि सातारा येथून आणलेल्या भवानी तलवारीच पूजन सुद्धा केलं.त्यावेळी तुम्हाला बाबासाहेब शिव अभ्यासक, शिव भक्त वाटतं होते. आज ते तुम्हाला महाराजांचे शत्रू वाटतं आहेत? कळू द्या एकदा महाराष्ट्र ला खरे पवार साहेब कोणते?”, असं आनंद दवे (Anand dave) यांनी म्हटलंय.

शरद पवार काय म्हणालेत?

गेल्या काही काळात अनेकांनी शिवचरित्र लिहिली, त्यात काहींनी वस्तुस्थिती मांडली, काहींनी धादांत खोटी माहिती लिहिली. शिवाजी महाराज आणि शिवचरित्रावर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय इतर कोणीही केला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते तर छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा

बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर अन्याय केला, हे पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचे नसून निंदनीय आहे, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.  आम्ही जातीयवादी नाही, आम्ही सकारात्मक राजकारण करतो, असे पवार साहेबांनी पुण्यात परवा आम्ही न गेलेल्या ब्राह्मण बैठकीत सांगितले. तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेदेखील सर्वांसमोर मीडियाला सांगितले. ब्राह्मण महासंघाला खात्री होती, की राष्ट्रवादी जातीय राजकारण सोडणार नाही, म्हणूनच आम्ही ती भेट नाकारली होती, अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे.

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.