Eknath Shinde : आनंद दिघे साहेबांनी म्हटलं आहे गद्दारांना माफी नाही, देवेंद्र भुयारांनी राऊतांच्या जखमेवर मीठ चोळलं
आमदारावर दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. यात दुसरं-तिसरं काही नाही. कोण-कोण सूर्याजी आहेत. हे सर्व संजय राऊत यांनी शोधावं. आमचं नाव त्यावेळी शोधलं असं त्यांचं मत होत. त्यावेळी त्यांनी ब्रम्हदेवाची उपमा दिली होती. यावेळी त्यांनी पुन्हा तो अवतार घ्यावा. आणि सगळे शोधावे. त्यामध्ये कोणकोण आहेत ते. मी कुणाचंही नाव घेणार नाही.
अमरावती : राज्याच्या विधान परिषदेचे काल रात्री निकाल लागले. यामध्ये भाजपच्या (BJP) पाच, तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पाच जागा जिंकून आल्या. काँग्रेसच्या हंडोरे यांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. शिवसेनेत (Shiv Sena) अनेक आमदार नाराज असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी समर्थीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हेही शिवसेनेवर नाराज होते. आता देवेंद्र भुयार म्हणतात, धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांनी म्हटलं होतं की, गद्दारांना माफी नाही. आता खासदार संजय राऊत हे त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार फुटले. याचा तपास घ्यावा. आणि त्या गद्दारांवर पहिल्यांदा कारवाई करावी. स्वतःच्याच पक्षातील माणस त्यांना टिकविता येत नाहीत. प्रामाणिक असलेल्या लोकांवर मागच्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी टीका केली होती. त्यावेळी त्यांनी आमची नावं उघड-उघड घेतली होती. आता त्यांनी त्यांच्या पक्षाचे कोणते गद्दार आहेत. सूर्याजी कोणकोणते आहेत. ते त्यांनी शोधावे.
पाहा व्हिडीओ काय म्हणाले, देवेंद्र भुयार
सूर्याजी कोण ते संजय राऊतांनी शोधावे
शिवसेनेचे 55 आमदार पक्के त्यांच्या पक्षाचे आहेत. त्यापैकी 52 जणांनी मतं दिले. त्यांच्यासोबत असलेले सहयोगी लोकं आहेत. त्यांना मंत्रीपदं मिळालेली आहेत. त्यापैकी कोण सूर्याजी झाले. त्याचा त्यांनी शोध घ्यावा. काँग्रेसच्या 46 लोकांपैकी 41 लोकांनी मतं दिलेत. त्यापैकी तीन आमदार कुठं गेलेत. हे त्यांच्या पक्षानी शोध घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेससोबत 51 आमदार होते. दोन जण जेलमध्ये आहेत. शिवाय 6 अपक्ष राष्ट्रवादीसोबत आहेत. मी डंके की चोट पे पहिलेपासून सांगतोय की, मी राष्ट्रवादीसोबत आहे. कोणी काहीही म्हणू देत. आमदारावर दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. यात दुसरं-तिसरं काही नाही. कोण-कोण सूर्याजी आहेत. हे सर्व संजय राऊत यांनी शोधावं. आमचं नाव त्यावेळी शोधलं असं त्यांचं मत होत. त्यावेळी त्यांनी ब्रम्हदेवाची उपमा दिली होती. यावेळी त्यांनी पुन्हा तो अवतार घ्यावा. आणि सगळे शोधावे. त्यामध्ये कोणकोण आहेत ते. मी कुणाचंही नाव घेणार नाही.तीन मतं त्यांचे फुटले. ते त्यांच्या पक्षातले झाले. आमदार कसे फुटले याची त्यांनी चौकशी करावी.
… तर अशी वाईट परिस्थिती झाली नसती
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 11 आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे सूरतच्या हॉटेल ली-मेरिडीअनमध्ये असल्याचं समजते. यासंदर्भात देवेंद्र भुयार म्हणाले, सगळ्याच आमदारांमध्ये खदखद आहे. कोणत्याही आमदाराला विश्वासात घेतलं नाही. त्यांचा एकसुद्धा काम करण्यात आला नाही. साधा पटवाऱ्याची बदली करण्याचं कामही करण्यात आलं नाही. कुणी ऐकत नाही. निधीबद्दल वानवा होती. पाहिजे तसा निधी मिळाला नाही. मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिली असती. मंत्र्यांनी आमदारांना सन्मान दिला असता तर अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली नसती.