मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा

ब्रेकिंग! अंधेरी पूर्व विभानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात मोठी राजकीय घडामोड

मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 1:05 PM

दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri Eas By Election) भाजपने (BJP) माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांचा विजय निश्चित मानला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत, असंही बानवकुळे यांनी स्पष्ट केलं.

2019च्या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली होती. 2019च्या निवडणुकीत मुरजी पटेल हे दुसऱ्या स्थानी राहिले होते. त्यानंतर आता भाजपकडून त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली होती. शिंदे गटानेही मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला होता.

मात्र आता पुन्हा मुरजी पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. ते पक्ष आदेशाचा पालन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्यावर कोणताही दबाब नसून आपण अर्ज मागे घेतला आहे, असं मुरजी पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

Video : नेमकं बावनकुळे यांनी काय म्हटलं?

शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक शिंदेच्या बंडखोरीनंतर प्रतिष्ठेची बनली होती. मात्र आता भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अखेर भाजपची माघार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहोत. रविवारी रात्रीनंतर भाजप नेत्यांच्या आज सकाळीही महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातील देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनीही तेच आवाहन केलं होतं. दरम्यान, अखेर ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

ऋतुजा लटके काय म्हणाल्या?

बिनविरोध निवड होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर ऋतुजी लटके यांनी सर्व राजकीय नेत्यांचे आभार मानलेत. त्या टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. सर्व कार्यकर्त्यांची आणि माझीही ही इच्छा होती, की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं त्या म्हणाल्यात. दरम्यान, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीबाबतही ऋतुजा लटके यांनी आभार मानले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.