मशाल वि. ढाल-तलवार सामना नाहीच! वर्षावर शेलार-शिंदेंची रात्री खलबतं, रणनिती ठरली?

रात्री एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये वर्षावर नेमकी काय चर्चा? शिंदे भाजपचा प्रचार करणार?

मशाल वि. ढाल-तलवार सामना नाहीच! वर्षावर शेलार-शिंदेंची रात्री खलबतं, रणनिती ठरली?
दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 9:12 AM

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Andheri By Election) घडामोडींना वेग आला आहे. हायकोर्टाने ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना दिलासा दिल्यानंतर मुंबई रात्री महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shalar) यांच्या चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी शिंदे-शेलार यांच्यात झालेल्या चर्चेवरुन आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जातायत.

अंधेरी पूर्व विभानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. भाजप उमेदवाराला युतीचा उमेदवार म्हणून शिंदे यांचा पाठिंबा असल्याचं कळतंय. मुरजी पटेल यांना अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

हे सुद्धा वाचा

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीवेळी खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदे गट भाजपसाठी प्रचार करताना पाहायला मिळण्याची शक्यताय. त्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय. अंधेरी निवडणुकीसाठी प्रचाराची रणनिती नेमकी काय असेल, यावर दोन्ही नेत्यांमध्ये काल महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर बोलणं झालं असण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठीच्या प्रक्रियेतला आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज भरावा लागणार आहे.

भाजपकडून मुरजी पटेल या पोटनिवडणुकीत आपला अर्ज भरणार आहे. तर ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटकेही आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्वची जागा शिवसेनाला सोडण्यात आली होती. पण त्या निवडणुकीत मुरजी पटेल यांनी भाजपत बंडखोरी केली होती. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत रमेश लटके यांना निर्विवाद विजय झाला होता. दरम्यान, आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.